लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुस्मिता विखे पाटील यांच्या माध्यमातून संस्थेमध्ये विविध उपक्रम हे सुरू आहेत. त्यांचे मोठे कौतुक पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे. आज त्यांचा वाढदिवस यानिमित्त....
प्रवरेचा विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न व्हावा. यासाठी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील,प्रवरा अभिमत विद्यापीठांचे कुलपती डाॅ.राजेंद्र विखे पाटील आणि युवानेते डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सुस्मिताताई विखे पाटील या विविध उपक्रम हे राबवत असतात. शिक्षणासोबतच ग्रामीण विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञान त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी.यासाठी कमी जागेत जास्त उत्पादन या संकल्पनेतून व्हावी म्हणून कृषी संलग्नित महाविद्यालय यांच्या माध्यमातून विविध फळे भाजीपाला पिकाची लागवड त्याची मार्केटिंग याची माहिती ते विद्यार्थ्यांना देतात प्रसंगी पालकही याची माहिती आवर्जून जाणून घेतात त्याचबरोबर संस्थेच्या माध्यमातून नुकता संपन्न होत असलेला प्रत्येक शाळेचा वार्षिक संमेलन कार्यक्रम देखील विद्यार्थ्यांना पर्वणी ठरत आहे या माध्यमातून संपूर्ण देशाच्या संस्कृती परंपरा कला आणि त्या भागातील विविधता त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये जात आहे. संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासोबतच चाणक्य कौशल्य प्रशिक्षण योजना, प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्र, पोलीस आर्मी भरती प्रशिक्षण केंद्र आणि नुकताच त्यांच्या संकल्पनेतून ग्रामीण विद्यार्थ्यांना मेडिकल अभियांत्रिकी, औषधनिर्माण यासारख्या प्रवेशासाठी लागणारी सीईटी, नीट आणि जेईईची तयारी देखील त्या आता संस्थेच्या माध्यमातून करत आहे.जेईई सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी प्रवरेत अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. जूनमध्ये वारीचा उपक्रम राबविण्यात आला. यात ३० हजार विद्यार्थी - विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून रेकॉर्ड बनवला. प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी स्थापन करण्यात आली. त्या माध्यमातून विविध खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरावर मुले चमकत आहेत. संस्थेचे अध्यक्ष मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेतून नोव्हेंबर महिन्यात प्रवरेमध्ये सेंट्रलाइज किचन ही संकल्पना राबविण्यात आली. त्या माध्यमातून संस्थेच्या सर्व हॉस्टेलमधील साडेसहा हजार मुलांचे जेवण एकाच ठिकाणाहून बनविले जाते. इयत्ता ६ वी ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी १ जानेवारी २०२६ पासून प्रवरा फाउंडेशन अकॅडमी सुरू होईल. गुणवत्ता वाढीसाठी मध्यंतरी शिक्षकांचे ट्रेनिंग घेण्यात आले. एक्सपर्टच्या मदतीने प्रवरेची पुस्तके तयार केली आहेत.
लोकनेते पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था ही संस्था आज ग्रामीण भागासाठी ग्रामीण विद्यापीठ ठरत आहे संस्थेच्या माध्यमातून शहरीपेक्षा चांगले शिक्षण ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी अहोरात्र परिश्रम डाॅ.सुस्मिता विखे पाटील या घेत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी हे कलाक्षेत्रातही आघाडीवर आहे याच उद्देशाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेला सहकारातून समृद्धीकडे प्रवरा साकृतिक गणेश उत्सव हा विद्यार्थ्यांसाठी आणि परिसरासाठी आगळावेगळा ठरला लाठीकाठी झांज ढोलीबाजा या माध्यमातून त्यांनी नकळत डीजे मुक्त गणेश उत्सव हा संदेश दिला प्रत्येक शाळेचा सहभाग यामध्ये त्यांनी मिळवला या माध्यमातून जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांचे ढोल ताशा लेझीम लाठीकाठी आणि झेंडा पथक या माध्यमातून त्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकी विश्वविक्रम केला. भारतीय संस्कृती चा जतन व्हावं यासाठी आणि हे सणवार उत्सव विद्यार्थ्यांना माहिती व्हावे या उद्देशाने त्यांनी नवरात्र उत्सव देखील आगळावेगळा ठरला आपल्या परिसरामध्ये नवदुर्गा असणाऱ्या विविध महिलांची ओळख विद्यार्थ्यांना नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून होत असतानाच नवरात्र उत्सव ही परंपरा का साजरी केली जाते हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी दाखवून दिले. खरंतर विखे पाटील हेच एक विद्यापीठ म्हणावे लागणार आहेत कारण त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी वेगवेगळ्या मॉडेल हे उभे राहत असतं पद्मश्रींनी सहकार चळवळ जपली पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण विकासातून ग्रामीण भाग उभा राहू शकतो हे दाखवून दिलं सध्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिक्षण, ग्रामीण विकास आणि त्यांना मिळालेल्या वेगवेगळ्या मंत्रिपदाच्या माध्यमातून सर्व मंत्रिपदे ही लोकाभिमुख केली आज शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या डाॅ.सुस्मिता ताई विखे पाटील असतील त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या मुलांना नवव्या व्यासपीठ उपलब्ध करून दिले ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यावर त्यांची विशेष नजर आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणानुसार त्याला घडवण्याचे काम ते प्रवरा ग्रामीण शिक्षण प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करत आहेत प्रवरा बिल्डिंग हा आगळावेगळा उपक्रम त्यांनी केला या माध्यमातून त्यांनी प्रत्येक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कल्पक वृत्तीला व्यासपीठ उभे करून दिले. या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी दोन कोटीची उलाढाल केली आज अनेक विद्यार्थ्यांनी या माध्यमातून सक्षम असा रोजगारही मिळवला अनेक विद्यार्थ्यांचे उद्योग ग्रामीण भागामध्ये व्यवसायाची नवी संधी ही उपलब्ध व्हावी या दृष्टीने प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये त्यांनी त्यांनी प्रिझम स्टार्ट अप याला चालना दिली आहे इस्रो द्वारे होणारे संशोधन हे प्रवर्त व्हावे यासाठीही त्यांनी पुढाकार घेतलाय प्रवरेचा विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिक्षणासोबतच क्रीडा संस्कृती कला अशा क्षेत्रातही त्यांनी वेगवेगळे प्रयोग हे सुरू केले. शिक्षण क्षेत्राबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे एक वेगळं टॅलेंट आहे आणि हे टॅलेंट शोधून त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना सोशल मीडियाचा वापर हा कशा पद्धतीने आपण समाजकार्यासाठी करू शकतो हे दाखवून दिले आज प्रवरेचे विद्यार्थी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय चांगले व्हिडिओ रिले फेसबुक चा वापर करून सामाजिक कार्यातही पुढे आहे प्रवरेच्या विद्यार्थी हा नोकरी करणारा नव्हे तर नोकरी देणारा ठरावा यासाठी त्या कार्यरत आहेत अशा ह्या विद्यार्थी प्रिय प्राध्यापकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या आणि सगळ्यांसाठी आयडॉल ठरणाऱ्या आमच्या सुस्मिता ताई प्रवरा परीवारात माईताई या नावाची वेगळी ओळख आहे...कधी कुठे प्रकाझोतात न येता
प्रसिध्दीच्या मागे न लागता...आपल्या बुध्दी कौशल्यान
आणि कर्तृत्वान डाॅक्टरेट मिळवून पुढे जाण्याचे त्यांचे ध्येय निश्चित आहे.लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून संस्थेला योग्य दिशेने पुढे नेण्याचा दृष्टिकोन सुस्पष्ट आहे. यासाठी त्यांची असलेली सक्रीयता उज्वल भविष्याचे द्योतक ठरते.नाविन्याचा ध्यास....
आणि खासदार साहेबांच्या विचाराने पुढे जावून त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठीची जिद्द आणि यासाठी घ्याव्या लागण-या मेहनतीची प्रचंड तयारी त्यांची आहे....
सहकारी वर्गाला समजून घेवून टिमवर्क यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेले संघटन कौशल्य त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसते....
गणेश उत्सवात यशस्वी केलेला
सहकारातून समृध्दीचा उपक्रम,विद्यार्थ्यासाठी
आयोजित केलेला प्रवरा बिझनेस एक्स्पो मधून त्यांनी विद्यार्थी शिक्षक पालक आणि विद्यार्थ्याच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले...
.प्रवरा परीवाराच्या सामाजिक बांधिलकीसाठी
विविध उपक्रमातून तत्पर राहूनअनेक भूमिका यशस्वी करून दाखव-या आणि भविष्यातील शिक्षण, सहकार चळवळीतील एक यशस्वी महीला नेतृत्व म्हणून
पुढे येत असलेल्या डाॅ सुस्मिता राधाकृष्ण विखे पाटील अर्थात माईताई यांना वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
- यमन पुलाटे,लोणी.
0 Comments