महाराष्ट्र राज्य शंभूसेना संघटना , यांचे वतीने छत्रपती संभाजीराजे कार्य पुरस्कार देऊन साहेबराव खामकर यांचा सन्मान -


 

    श्रीगोंदा - महाराष्ट्र राज्य शंभूसेना संघटनेच्या वतीने दरवर्षी ऊल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याबद्दल संबंधितांना छत्रपती संभाजीराजे कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.त्यानुसार श्री क्षेत्र श्रीगोंदा येथील साहेबराव खामकर यांचे सामाजिक व सहकार क्षेत्रातील ऊल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सन २०२५ चा कार्यगौरव पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले.या संघटने मार्फत तरूणांसाठी रोजगार मेळावे व व्यावसायिक मार्गदर्शन केले जाते , अशी माहिती संघटनेचे संस्थापक सेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुलनाना माने पाटील यांनी दिली.

ऊस उत्पादक संघाच्या मार्फत देखील शेतकऱ्यांकरीता प्रशिक्षण, ऊसभूषण पुरस्कार आदी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे माने पाटील पुढे म्हणाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष किरण चव्हाण यांनी भाषणात संघटनेच्या कामाचा आढावा घेतला.
सत्कारास उत्तर देतांना खामकर म्हणाले की , शंभूसेना संघटना व ऊस उत्पादक संघाचे कार्य कौतुकास्पद असून अशा उपक्रमा मुळे ऊर्जा निर्माण होऊन सामाजिक कार्य अधिक जोमाने करण्यास प्रोत्साहन मिळते , त्या बद्दल संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद मानले.कार्यक्रमास संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डाॅ. ज्ञानेश्वर बदे यांचेसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
................................
 कृपया , आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध करावी , ही विनंती.

Post a Comment

0 Comments