टाकळीभान प्रतिनिधी- मातुलठाण येथील एकल महिला उषा योगेश लवांडे यांनी पतीच्या निधनानंतर संकटावर मात करीत आपल्या मुलांचे शिक्षण सुरूच ठेवले अनं एक स्वप्न घेऊन संघर्ष करीत राहिल्या.आर्थिक शैक्षणिक संघर्ष करताना जेव्हा आपला मुलगा ओंकार सैन्यदलात भरती झाला तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले .
एक स्वप्न उराशी बाळगून जेव्हा आई नाजूक परिस्थितीशी झगडून न डगमगता यश मिळवते तेव्हा त्याचं मोल शब्दात व्यक्त करता येत नाही.
गेल्या काही वर्षापासून तालूक्यातील निराधार मुलांपर्यंत राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी बालसंगोपन योजनेच्या माहितीसह लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे मुकूंद टंकसाळे सर यांनी लवांडे कुटूंबातील मुलगा ओंकार व मुलगी पायल यांना बालसंगोपन योजनेचे अर्ज भरून दिले व त्यांना योजनेचा लाभ सुरू झाला.मुलगा ओंकार हुशार असल्याने आईचे कष्ट कामी आले तर बालसंगोपन योजनेमुळे आर्थिक संकटावर मात करता आली, मातुलठाण येथे माध्यमिक शाळा नसल्याने शिक्षणासाठी दुरवर असलेल्या गावातील शाळेचा आधार घेऊन संघर्ष करीत ओंकार याने पुढील शिक्षण पुर्ण केले व आपले ध्येय गाठले अनं आईचे स्वप्न सत्यात उतरवले गावाचाही अभिमान ठरला आर्थिक परिस्थितीवर मात करताना राज्य शासनाची बालसंगोपन योजना राबवणारे मुकूंद टंकसाळे सर यांचे विशेष आभार हे कुटूंब व्यक्त करते ,
बालसंगोपन योजना निधीसाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करीत असलेले राज्य निमंत्रक हेरंबजी कुलकर्णी सर,राज्य समन्वयक तथा मिशन वात्सल्य शासकिय समितीचे मिलिंदकुमार साळवे,बाळासाहेब जपे, दिलीप लोखंडे, कृष्णा बडाख यांच्याही मदतीचा उल्लेख लवांडे कुटूंब करीत आहे ,सैन्यदलात निवड झालेल्या ओंकार योगेश लवांडे,कृष्णा भागीरथ कोटकर या दोघांचेही साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंबजी कुलकर्णी सर,राज्य समन्वयक मिलिंदकुमार साळवे सर,मुकूंद टंकसाळे सर,बाळासाहेब जपे दिलीप लोखंडे, कृष्णा बडाख,आदींनी अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या,
0 Comments