दिलेल्या मुदतीत आदिवासी मुलीचा शोध न लागल्यास नेवासा पोलीस स्टेशनवर आदिवासींचा हल्लाबोल मोर्चा-ज्ञानेश्वर अहिरे

सत्तेचा महासंग्राम न्यूज.डिजिटल मिडिया 

आदिवासी मुलीच्या अपहरण प्रकरणाकडे लागले जिल्ह्याचे लक्ष
-----------------------
नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आदिवासी मुलीच्या आई-वडिलांना लेखी पत्र‌ दिल्याप्रमाणे ‌ लवकरात लवकर कारवाई केली नाही तर आता थेट नेवासा पोलीस स्टेशनवरच आदिवासींचा हल्लाबोल मोर्चा काढण्यात येईल असा इशारा ‌एकलव्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे. त्यामुळे अल्पवयीन आदिवासी मुलीच्या अपहरण प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

        नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण होऊन 29 दिवस झाले परंतु पोलिसांनी मुलीचा शोध घेतला नाही. तसेच आरोपीला पाठीशी घालण्याच्या उद्देशाने मुलीच्या आई-वडिलांना उडवा ऊडविची उत्तरे दिली.

 व हलगर्जीपणा करून कर्तव्यात कसूर गेला केला त्यामुळे भिल्ल समाज प्रचंड आक्रमक झाला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली कालपासून ‌ भिल्ल समाजाचे नेते कैलास दादा माळी, राधाकृष्ण बर्डे, सुदामराव मोरे, संजय गांगुर्डे ,अशोक पवार, चंद्रकांत बेर्डे, भगवान बर्डे रेणुका गायकवाड, गणेश गायकवाड, यांनी नेवासा पोलीस स्टेशन समोर आदिवासी अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन आरोपीवर कठोर कारवाई करावी व मुलीच्या अपहरणांमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. त्यानंतर नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी रात्री दहा वाजता उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली व चार ते पाच दिवसात मुलीचा शोध घेऊन मुलीला आई-वडिलांच्या ताब्यात देऊ.व आरोपीवर कायदेशीर कारवाई करू तसेच आरोपीवर 137 (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याचेही त्यांनी सांगितले. व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यामुळे नेवासा पोलीस स्टेशन समोरील ऊपोषण‌ आज मागे घेतले आहे. परंतु जरी उपोषण मागे घेतले असले तरी येत्या चार-पाच दिवसात पोलिसांनी दिलेला शब्द जर पाळला नाही तर जिल्ह्यातील आदिवासी भिल्ल समाज नेवासा
पोलीस स्टेशनवर हल्लाबोल मोर्चा घेऊन येईल व त्यानंतर जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यास नेवासा पोलीसच जबाबदार राहतील असा खणखणीत इशारा ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिल्याने हे प्रकरण आता कोणते वळण घेते व आदिवासी अल्पवयीन मुलीचा शोध पोलीस किती दिवसात घेतात व या प्रकरणात किती आरोपी आहेत याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments