वृक्ष हे किती तोला मोलाचे हा संदेश देत बहुलीच्या निसर्ग प्रेमी गावकऱ्यांनी केली देशातील पहिली वृक्ष तुला---- पर्यावरणाच्या रक्षणासाठी आयुष्य झिझवणाऱ्या डॉ. संतोष पाटील यांचा ५० व्या जन्मदिनी गौरव ---------




दिलीपशिंदे
सोयगाव दि.१८-- राजकीय व्यक्ती, पुढारी , नेते यांच्या वाढदिवसाला पेढे तुला, साखर तुला, लाडू तुला नेहमीच होत असते. मात्र तालुक्यातील बहुली या राज्यातील पहिले फटाकेमुक्त गाव व पर्यावरण ग्राम असलेल्या गावातील निसर्ग प्रेमी नागरिकांनी २५ वर्षांपासूनचा जिव्हाळा , घनिष्ठ नाते जपलेल्या सिल्लोड येथील पर्यावरण , वन्यजीव, वृक्ष संवर्धक म्हणून गेल्या वीस वर्षांपासून कार्य करणाऱ्या डॉ संतोष पाटील यांचा ५० व्या जन्मदिनी आजवर कधीही न झालेली वृक्ष तुला केली.

 या उपक्रमाचे वैशिष्ट्य सांगताना भाऊसाहेब निकोद यांनी सांगीतले की तराजुच्या एका पारड्यात सन्मानमूर्ती व दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजना इतके वायवर्ण, पारस पिंपळ, मोह, पांढरा गुंज, विजयसार, जारूळ, कदंब , अमलतास, काटे सावर, सोन सावर इत्यादी १३५ प्रजातीची स्वदेशी दुर्मिळ झाडे ठेवण्यात आली. एका वेळेस सुमारे ४० रोप भरली. असे जीवनाचे एका वर्षाचे ४० या दराने ५० वर्षाचे २००० रोपांची वृक्ष तुला करण्यात आली. काही रोप लावण्यात आली. उर्वरित सर्व रोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून बहुली येथील अमृत वनात, शेतकऱ्यांच्या बांधावर, केऱ्हाळा येथील वारकरी संस्था, खेळणा फाटा येथील संघाच्या ७ एकर जागेत लावण्यात व संगोपित करण्यात येतील. हरित महाराष्ट्र घडवण्यासाठी असे उपक्रम राबविण्यात यावे व या निमित्ताने देशात हा पायंडा नक्कीच पडेल असा विश्वास बहुली करांनी व्यक्त केला आहे. यावेळी संजय शिरसाठ, भाऊ साहेब निकोद,मधुकर जंजाळ, प्रभत पिसाळ,गजानन जंजाळ , राधाकृष्ण साखळे , समाधान जगदाळ,श्रीरंग तुपे ,रविंद तुपे, प्रभू जंजाळ, भिकन सोनोने , ऋषिकेश पंडित, डॉ.शिरसाठ,कृष्णा जरारे, राजू लवटे, सुधाकर बनसोडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments