देवस्थाने व मंदिरे हा आपला संस्कृतीचा पाया...ह भ प. गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज( महाराजांच्या हस्ते टाकळीभान येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नूतन सभा मंडपाचे उद्घाटन व श्री संत तुकाराम महाराज मंदिराला दिली भेट...)

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी-: देवस्थाने व धार्मिक स्थळे आपल्या संस्कृतीचा खरा पाया असून टाकळीभान येथील प्रति पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व श्री संत तुकाराम महाराजांच्या नव्याने होत असलेल्या मंदिरांद्वारे हा पाया अधिक भक्कम करण्याचे काम टाकळीभानकरांनी केले असल्याचे प्रतिपादन ह. भ. प. गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज यांनी केले.

 टाकळीभान येथील प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वरील बाजूस झालेल्या नूतन सभामंडपाचे उद्घाटन ह. भ प. महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांच्या हस्ते पार पडले तसेच नव्याने सुरू असलेल्या श्री संत तुकाराम महाराज मंदिरास महाराजांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी ग्रामस्थ व उपस्थितांना उदबोधित केले. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत राहुल पटारे यांनी केले तर उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी मंदिराच्या बांधकामा संदर्भात, लोकवर्गणीतून झालेली मदत व लोकप्रतिनिधी यांनी मंदिरासाठी केलेले सहकार्य, व मंदिर बांधकामा संदर्भात पुढील वाटचाल याबद्दलची माहिती दिली. यावेळी महाराज म्हणाले की आपण
सर्व जाती-धर्मांचा आदर सन्मान केला पाहिजे सर्व धर्माची शिकवण एकच असून त्यातून आपलेपणा, बंधूभाव, व एकीची भावना वृद्धिंगत होते. त्याचप्रमाणे आधुनिक काळामध्ये मंदिराबरोबरच समाजामध्ये काही माणसांचा जिर्णोद्धार होणे ही गरजेचे असल्याचे ते म्हणाले. एखादी व्यक्ती अज्ञानामुळे, घडलेल्या चुकीमुळे, अयोग्य संगतीमुळे अडचणीत आल्यानंतर लयाला जाते, समाज अशा व्यक्तीचा तिरस्कार करून त्याला अधिक दुःखाच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न करतात. परंतु अशा व्यक्तीला समजावून घेऊन त्याला धीर वआधार देऊन दुसऱ्याचे दुःख ते आपले दुःख मानून अशा व्यक्तींना प्रवाहात आणून त्या व्यक्तीचा जीर्णोद्धार करणे, व त्यांना एक सुजाण नागरिक बनविणे समाजाच्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी महाराजांच्या हस्ते ह भ प ऋषिकेश महाराज वाघुले यांच्या आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे उद्घाटन ही राम मंदिर येथे पार पडले. याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माजी सभापती नानासाहेब पवार, सोसायटीचे चेअरमन मंजाबापू थोरात, . श्रीकांत भालेराव,प्रा. जयकर मगर,आबासाहेब ढूस, रोहिदास पटारे, खंडेराव गवांदे सर, ह भ प बाळासाहेब महाराज कानडे,ह भ प दत्तात्रय बहिरट महाराज, ह.भ.प लक्ष्मण नांगरे महाराज,ह भ प संतोष पटारे महाराज, ह भ प राधेश्याम महाराज पांडागळे, ह भ प सुदाम महाराज चौधरी, ह भ प सुदाम महाराज होन, ह भ प रविंद्र महाराज गांगुर्डे, भ प शुभम महाराज बनकर, डॉ. सोनल भालेराव आदी सह संत तुकाराम महाराज मंदिर विश्वस्त मंडळ, सद्गुरु किसनगिरी बाबा भक्त मंडळाचे सर्व सदस्य, महिला पुरुष भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments