राहाता तालुका प्रतिनिधी
गोदावरी उजवा कालवेच्या उन्हाळी आवर्तनातून लाभक्षेत्रातील उभे असलेल्या सर्व पिकाना पाणी द्यावे असी मागणी गोदावरी उजवा कालवा राहाता कार्यलयाचे अभियंता यांचेकडे निवेदनाद्धारे शेतकरी संघटनेचे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की यावर्षी धारणा धरणात व समुहातील धरणात चांगला पाणीसाठा आहे शिवाय यावर्षी उन्हाची क्षमता जास्त असल्याने लाभक्षेत्रातील पिके पाण्याअभावी जळत आहे .शिवाय मान्सूनचे आगमन उशीरा होत आहे. तरी पाटबंधारे विभागाने उन्हाळी आर्वतनाचे नियोजन टेलच्या चितळी सेक्शन पासून सुरू करावे तसेच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सात नंबर मागणी फार्म प्रमाणे पाणी द्यावे तसेच ज्या शेतकऱ्याकडून सात नंबर फार्म भरावयाचे राहीले त्यांनी पाटबंधारे विभागाकडे पाणी मागणी केली तर त्यांच्या उभ्या असलेल्या तातडीने फार्म भरून पाणी द्यावें कारण पाऊस लाबल्यांने पिके जळू लागली आहे. विहीरीच्या पाणी पातळी कमी झाली आहे तरी एक पाणी मिळाले तर जनावराचा चारा ऊस फळबागा टिकतील तरी आपण सहानभुती दाखवून पाणी द्यावे शिवाय पाटबंधारे विभागाला व शाशनाला पैसे मिळेल व शेतकऱ्याचे पिके वाचतील तरी येणाऱे आर्वतन पुर्ण क्षमतेने टेलपर्यंत करून येणारे उन्हाळी आर्वतन नियोजनापैक्षा चार ते पाच दिवस वाढवून करावे अशी मागणी विठ्ठलराव शेळके व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्धारे केली आहे.
0 Comments