दिलीप शिंदे
सोयगाव दि.०९-- आमखेडा ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणी साठी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे कार्यकर्ते बाळू हेमराज बेदवे ग्राम पंचायत सदस्य आमखेडा यांनी दि.०९ मंगळवारी सकाळी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. पंचायत समितीचे सभापती उत्तम चव्हाण,सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी काळे यांनी उपोषणकर्त्याची समज काढली सहाय्यक गटविकास अधिकारी अमोल जगताप यांनी पंधरा दिवसात कारवाई करण्याचे दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण कर्त्यास सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्याहस्ते पाणी देऊन आमरण उपोषण सोडण्यात आले.
यावेळी विस्तार अधिकारी पंचायत अशोक दौड, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष संजय पाटील, सुनील गावंडे,मयुर मनगटे,शिवराम जाधव,कमलेश काळे, निलेश गाडेकर , गजानन पवार,विजू गव्हाड आदी उपस्थित होते..
0 Comments