टाकळीभान येथील ऋषीकेश कांबळे यांचा पाटाच्या पाण्यात पडून मृत्यू ; सकाळी आढळला मृतदेह

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी - टाकळीभान येथील ऋषीकेश नामदेव कांबळे (वय ३०) या तरुणाचा चारी क्रमांक १६ मधील वाहत्या पाण्यात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २४) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे टाकळीभान परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषीकेश कांबळे हा बुधवारी (दि. २३) रात्री दुचाकीवरून जात असताना चारी क्रमांक १६ मधील पाण्यात पडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या भंडारदरा जलाशयातून चारी क्रमांक १६ द्वारे शेतीसाठी आवर्तन सुरू असल्याने चारीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.

Post a Comment

0 Comments