दिलीप शिंदे
सोयगाव दि.२४-- सोयगाव येथील कै. बाबूरावजी काळे मराठी स्कूलच्या श्री गणरायाला दि.२४ गुरुवारी शालेय विद्यार्थ्यांनी लेझीमचा ठेका घेत ढोलताशांच्या गजरात भक्तिभावाने निरोप दिला यावेळी विद्यार्थी भावूक झाले होते. कै.बाबूरावजी काळे मराठी स्कूल मधील श्री गणपती बाप्पा ची मिरवणूक गावातील श्री भवानी माता मंदिर येथून जुना बाजार चौक, काळे गल्ली वाल्मिकी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विसर्जन स्थळापर्यंत ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी लेझिमचा खेळत मिरवणूक काढण्यात आली होती.
सोना नदीत श्री गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला यावेळी विद्यार्थी भावूक झाले होते. दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक निलेश पाटील, उपमुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलीस, प्राध्यापक दादासाहेब पवार, योगेश काळे, रुपाली मानकर, मनीषा पाटील, सागर घाटे, विद्या पाटील, अंजली कथळकर, आशा पंडीत, अरुणा भोई, सागर पाटील,उमेश जाधव, वैशाली खेडकर, भाग्यश्री काळे, रंजना जाधव, श्रुती दुसाने, प्रणव कुलकर्णी, देवानंद आव्हाड, शीतल जाधव, नलिनी पाटील,संजय डापके, ज्ञानेश्वर पंडीत, रमेश कंडारे, कृष्णा गोतमारे, रुख्मिणी नेरपगार, लता गायकवाड, सुनीता जाधव सचिन पाटील, गोपाल शेवरे, अरुण पाटील आदींसह शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने मिरवणुकीत उपस्थित होते.
0 Comments