विजय बोडखे
राजुरी (वार्ताहर) राजुरी विविध कार्यकारी सेवा संस्थेची 77 वी वार्षिक सर्वसाधारण सभा काही विषयावर गरमागरम चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे . राहाता तालुक्यातील राजुरी विविध कार्यकारी सहकारी संस्थेची 77 वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन डॉ सोमनाथ बाळासाहेब गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला संस्थेचे दिवंगत सभासद, दिवंगत महान व्यक्ती यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज, सहकाराचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेची सुरुवात झाली. यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषयावर चर्चा झाल्यानंतर संस्थेच्या धान्य विभाग, खत विभाग व जनरल ऑफिस संदर्भातील विविध विषयांवर खडाजंगी चर्चा झाली. संस्थेच्या सभासदांनी वार्षिक ताळेबंदातील अनेक गोष्टींवर सखोल चर्चा केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ सोमनाथ गोरे यांनी सभासद यांनी केलेल्या प्रत्येक प्रश्नाला सडेतोड व मार्मिक उत्तरे दिली. संस्थेचे सचिव बाळासाहेब नामदेव गोरे यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. यानंतर अनेक ज्येष्ठ सभासद व महिला सभासद यांचा सभेत सत्कार करण्यात आला.यावेळी गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते मारुतीराव गोरे,नामदेव भागवत गोरे,
तुकाराम बाळाजी गोरे,तुकाराम केरू गोरे,अर्जुन लक्ष्मण गोरे, पोपट सूर्यभान गोरे गोरक्ष चांगदेव गोरे,सुधाकर दादा गोरे,मच्छिंद्र दगडू पठारे,भाऊसाहेब निवृत्ती भालेराव,बापूसाहेब रामदास गोरे,राजेंद्र गोरे,यांच्यासह संस्थेच्या व्हा चेअरमन श्रीमती हिराबाई बापू लक्ष्मण खर्डे,संचालक गंगाधर लाळगे,नानासाहेब गोरे,चंद्रभान गुंजाळ,सुरेश कसाब,अशोक गोरे,सोपान कदम,संजय गोरे,बाबासाहेब राहीज,बाळासाहेब भालेराव,सुधीर गोरे,सौ निर्मला सूर्यभान गोरे,तज्ञ संचालक अण्णासाहेब बेंद्रे,रावसाहेब गोरे,अनिल कडसकर,यांच्यासह संस्थेचे जेष्ठ सभासद,ग्रामस्थ,संस्थेचे कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments