गणपती विसर्जन स्थळाची तहसीलदार मनीषा मेने व सपोनी दिनकर गोरे यांच्याकडून पाहणी, कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना....




दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.२४ -- शहराच्या बाहेर असलेल्या गवळणीचा नाला येथील पाझर तलावात श्री गणपती विसर्जन केले जाणार असल्याने विसर्जन स्थळाची तहसीलदार श्रीमती मनीषा मेने व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी श्री गणपती विसर्जन स्थळाची पाहणी केली. शहरासह, आमखेडा व कंकराळा येथील सर्वच गणेश मंडळाची शहराच्या बाहेर असलेल्या गवळण नाला येथील पाझर तलावात श्री गणेश विसर्जन होणार आहे.


 त्यासाठी नगर पंचायत कडून विसर्जन स्थळी योग्य उपाययोजना करण्यात आल्या असून याठिकाणी सपोनि दिनकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. काही अपरिहार्य घटना घडू नये यासाठी १०८ ही रुग्णवाहिका सुध्दा उपलब्ध असणार आहे. या सर्व उपाय योजनांचा आढावा तहसीलदार श्रीमती मनीषा मेने यांनी गवळणी नाला येथील पाझर तलाव या श्री विसर्जन स्थळी जाऊन घेतला. यावेळी त्यांनी नगरपंचायत, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सपोनी दिनकर गोरे, गजानन दांडगे, नगरपंचायत कर्मचारी राजेश मानकर, राजेंद्र जंजाळ,समाधान गायकवाड, सारंग बागले आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments