दिलीप शिंदे
सोयगाव दि.२४-- सोयगाव पोलिस ठाण्यात दि.२४ गुरुवारी रात्री ०१:४५ वाजता डिजे वर पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. श्री गणेश विसर्जनाच्या आदल्यादिवशीच गुन्हा दाखल झाल्याने डिजे धारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२३ बुधवारी रात्री ०९:२४ वाजता शुभम ज्ञानेश्वर साळवे
हा रमाबाई कॉलनी येथील बुध्द विहार समोर सार्वजनिक रस्त्यावर आयशर वाहन क्रमांक एमएच ३१ सीबी ८०९३ हे वाहन धोकादायकरित्या साउंड सिस्टम बसविण्यासाठी लोखंडी सांगाडा तयार करुन हलगर्जी व निष्काळजीपणे सदरचे वाहन रस्ताने येणारे जाणारे वाहने व नागरिकांना जिवीत हानी होईल किंवा त्रास होईल असे रितीने चालवितांना विनाकागदपत्र मिळुन आल्या प्रकरणी पोलिस अंमलदार गजानन काशीनाथ दांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम ज्ञानेश्वर साळवे वय २४ वर्षे रा. मोढा खु. ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनी दिनकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर दांडगे पुढील तपास करीत आहे. दरम्यान डिजे वर झालेल्या कारवाईमुळे डिजे धारकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार डिजे मुक्त गणरायाला निरोप द्यावा असे आवाहन सपोनी दिनकर गोरे यांनी गणेशोत्सव मंडळांना केले आहे.
0 Comments