दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी -श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान गावांमधून जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग क्रमांक ५० वरील श्रीरामपूर नेवासा रोडवरील गावाच्या दुतर्फा अतिक्रमण केलेल्या अतिक्रमण धारक व अनधिकृत बांधकाम केलेल्या व्यावसायिक, अतिक्रमण केलेल्या लोकांना सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीरामपूर यांनी नोटीस काढून ८ दिवसाच्या आत अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा पोलीस संरक्षणामध्ये व शासनाच्या नियंत्रणाखाली अतिक्रमण काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अतिक्रमण केलेल्या व्यावसायिक व तात्पुरत्या रहिवासी लोकांचे धाबे दणाणले आहेत.
काल दिनांक ९ जून रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीरामपूर येथील अधिकारी व सर्व स्टाफ यांनी टाकळीभान येथे राज्य मार्ग क्र.५० श्रीरामपूर नेवासा रोडवरील रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण केलेल्या व्यावसायिक व तात्पुरत्या रहिवासी लोकांना प्रत्यक्ष उपस्थित राहून नोटीस बजावली आहे. तसेच या राज्य मार्ग क्रमांक ५० च्या मध्यापासून दोन्ही बाजूच्या ५० फुटापर्यंत येणारे सर्व अति अतिक्रमण व अनाधिकृत बांधकाम ८ दिवसाच्या आत तात्काळ काढण्यासाठी नोटीसीदरे सूचना केली आहे. सार्वजनिक बांधकाम उप विभाग श्रीरामपूरच्या अधिकारी यांनी प्रत्यक्ष उपस्थित
राहून रस्त्याच्या मध्यापासून ५० फुटापर्यंत अंतर मोजून अतिक्रमण मध्ये येणाऱ्या व्यावसायिक व तात्पुरत्या अनधिकृत अतिक्रमण केलेल्या रहिवाशांना नोटीस देऊन अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या आहेत व अतिक्रमण न काढल्यास पोलीस संरक्षणामध्ये सदर अतिक्रमण काढण्यात येऊन त्याचा खर्च अतिक्रमण धारकाकडून वसूल करण्यात येईल असा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्ये बांधकामासाठी सदर व्यक्तींकडे महसूल खात्याची मंजुरी असल्यास त्याची प्रत सादर करण्याची माहिती त्यांनी दिली आहे.
तसेच सदर अतिक्रमणधारकांनी रस्ता वाहतुकीस अडथळा करून अपघातजन्य स्थळ तयार झालेले आहे व त्यामुळे सदर ठिकाणी अपघात होऊन जीवित हानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अतिक्रमण धारकाची राहील असेही उल्लेख त्यांनी नोटिसीमध्ये केला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील व शासकीय जागेवरील अतिक्रमणचा मुद्दा गाजत असून त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सज्जड कारवाईने अतिक्रमण धारकांना कडक इशारा मिळाला आहे.
0 Comments