दिलीप शिंदे
सोयगाव दि.१७- वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची शासन परिपत्रकानुसार (तिथी ) दि १७ जून बुधवारी शासकीय व निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी करणे अनिवार्य असताना देखील या परिपत्रकालाच सायगाव तालुक्यात अधिकाऱ्यांनी तिलांजली दिल्याने ज्या कार्यालयात वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती साजरी करण्यात आली नाही अशा अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्याकडे दि.१७ बुधवारी सामाजिक कार्यकर्ते मोतीलाल घुसिंगे यांनी लेखी निवेदनाद्वारे केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान कंकराळा ग्रामपंचायतीचे ग्राम पंचायत अधिकारी सेवर यांनी ग्रामपंचायत कार्यालयात वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती साजरी केली नाही.शहरासह तालुक्यातील कार्यालयात महाराणा प्रताप सिंह यांची जयंती साजरी केली नाही अशा कार्यालयांची चौकशी करून संबंधित कार्यालयीन प्रमुखांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोतीलाल घुसिंगे यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान ग्रामपंचायत कडून सर्व महापुरुषांच्या जयंती नियमितपणे साजऱ्या केल्या जातात, मात्र महाराणा प्रताप सिंह यांची जयंती ग्राम पंचायत अधिकारी सेवर यांनी साजरी ग्राम पंचायत कार्यालयात साजरी केली नसल्याने राजपूत समाजाचा अपमान केला असल्याचा गंभीर आरोप मोतीलाल घुसिंगे यांनी केला आहे. याप्रकरणी तहसीलदार व गट विकास अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments