टाकळीभान प्रतिनिधी-साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीरामपूरच्या टाकळीभान उपबाजार आवारात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे संचालक मयुर पटारे व श्रीमती. विद्याताई दाभाडे आणि शाखाधिकारी दिनकर पवार यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
समता, सामाजिक न्याय आणि कष्टकरी समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर लेखणी व शाहिरीच्या माध्यमातून लढणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले,
या कार्यक्रमास परिसरातील व्यापारी, शेतकरी, ग्रामस्थ तसेच बाजार समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.,
0 Comments