संत इगन्नाथी लोयोला यांचे कार्य सर्व समावेशक समाजासाठी प्रेरणादायी -- फा.फ्रान्सिस पटेकर

संगमनेर तालुका प्रतिनिधी 

विविध सांस्कृतिक कार्यक्रमा द्वारे ज्ञानमाता विद्यालयात संत इगन्नाथी यांचा सण उत्साहात साजरा
 --- संत इगन्नाथी लोयोला यांनी आपल्या सर्व सुखाचा त्याग करून सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य क्षेत्रातील योगदानाबरोबरच मानवतेच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य समाजाप्रती प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन ज्ञानमाता विद्यालयाचे प्राचार्य फ्रान्सिस पटेकर यांनी केले. संत इगन्नाथी लोयोला यांच्या सणानिमित्त ज्ञानमाता विद्यालयात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आर.पी.आय.चे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, ऑल इंडिया ख्रिशन फोरमचे उपसंचालक अनिल भोसले, ॲड.रवी शेळके,डिस्ट्रिक्ट सुपीरियर फा. जो.गायकवाड, फा.रॉबर्ट डिकोस्टा, फा.प्रशांत शहाराव, फा.नोवेल फर्नांडिस, फा.रोशन बोरुडे,के.डी.भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
 उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत इगन्नाथी लोयोला यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
  यावेळी आशिष शेळके म्हणाले जेज्यूईट संघाचे प्रमुख संत इगन्नाथी यांनी वैभवशाली असलेल्या जीवनाचा त्याग करून वंचितांसाठी त्यांनी केलेले कार्य आदर्शवत असून आजचा विद्यार्थी हा उद्याचे भविष्य असल्याने शिक्षक तर विद्यार्थ्यांना घडवतात च परंतु त्याचबरोबर पालकांची सुद्धा जबाबदारी आहे.आज विद्यार्थ्यांनी गुरूंचा आदर करून सोशल मीडिया वर वेळ वाया न घालवता आपला देश घडवणाऱ्या थोर महामानवांना वाचावे ज्ञानमाता विद्यालयातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केले.त्यांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी जिद्द व कष्ट करण्याची वृत्ती जोपासली तर आपणही उंच शिखर गाठू शकता असेही यावेळी अनिल भोसले यांनी म्हटले.
 या कार्यक्रमात विविध विषयामध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना फा.रॉबर्ट डिकोस्टा यांच्या शिष्वृत्ती निधीतून प्रशस्तिपत्र व शालेय साहित्य देण्यात आले तर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून आपली कला सादर करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.
यावेळी सचिन मुंतोडे,सचिन सोनवणे,सचिन रोहोम, विकास बनसोडे,शारदा नवले,अर्चना डोंगरे,अनिल बोर्डे,संदीप थोरात 
 आदीसह विद्यार्थी,शिक्षक,व पालक वर्ग. मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन स्वाती शेळके यांनी तर अमोल वर्पे यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments