राजुरी येथील तालुकाप्रमुख सोमनाथ गोरे व शिवसैनिकांनी केला शिंदे गटात प्रवेश.


राजुरी (प्रतिनिधी) विजय बोडखे 
उबाठा सोडून अनेकांचा शिवसेना शिंदे गटात नुकताच प्रवेश केला आहे ! राहाता तालुका शिवसेना गट सोडून अनेक शिवसैनिकांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

शिर्डी मतदार संघातील खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे साहेब यांच्या प्रवेशानंतर त्यांचे असंख्य कार्यकर्ते कोल्हार येथील अनिल राधुजी बांगरे उपजिल्हाप्रमुख. शिवसेना राजुरी येथील सोमनाथ गोरे  तालुकाप्रमुख. 
शिवसेना राहाता तालुका विजय गोहर. उपतालुका प्रमुख राहाता पप्पू अतार .उपशहर प्रमुख कोल्हार राजेंद्र कापसे. वसंतराव लबडे .संतोष राजभोज .सुधाकर राऊत. सागर बांगरे. आबासाहेब कर्डिले. विजय मोरे .चंदू बेंद्रे .सुरज गोल्हार. रवी लांडे. यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते नुकताच प्रवेश करून सत्कार करण्यात आला आहे यावेळी प्रवरा परिसरातून असंख्य कार्यकर्ते शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला असून यावेळी मोठ्या संख्येने राहता तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments