सेवा संकल्प अभियान अंतर्गत माहेगांव देशमुख येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न



टाकली वरून प्रतिनिधी-कृषी संशोधन केंद्र, सावळ विहीर, कृषी विभाग,तालुका कोपरगाव यांचे संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियान अंतर्गत माहेगांव देशमुख ता. कोपरगाव येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता.   
    
    सदर प्रशिक्षण वर्गात डॉ. पी. एस. बेल्हेकर, प्रभारी अधिकारी यांनी पावसाच्या खंड काळात करावयाचे पीक नियोजन, तसेच आगामी रब्बी हंगामध्ये करावयाचे गहू, हरभरा, तेलबिया वर्गीय पिकांचे नियोजन या बाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. पी. पी. खंडागळे, सहाय्यक प्राध्यापक- व. रोगशास्त्र, निफाड यांनी कांदा पिकाचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले, श्रीमती टी. वाय. मेटे, मंडल कृषी अधिकारी, कोलपेवडी यांनी महिलांसाठी कृषी विभागाच्या योजना तसेच शेतकरी महिला प्रमाणपत्र याबाबत मार्गदर्शन केले. पी. जी. जाधव, उपकृषी अधिकारी, कोपरगाव यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. तसेच सतीश पद्माने, सहाय्यक कृषी अधिकारी, कोपरगाव यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. सदरच्या कार्यक्रमात सावळ विहीर फार्मच्या विक्री केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या विद्यापीठाच्या विविध उत्पादनांची माहिती देण्यात आली. तसेच शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाचे फुले मायक्रोग्रेड-II हे उत्पादन उपलब्ध केले. या कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब भगूरे व. संदीप भगूरे यांच्या फार्म हाऊस वर करण्यात आले होते. या कार्यक्रमास सावळ विहीर फार्मचे कर्मचारी आणि पंचक्रोशीतील एकूण 46 लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. 
   प्रासंगि कृषी संशोधन केंद्र सावळी विहीर प्रभारी अधिकारी डॉ.पी एस बेल्हेकर. कृषी अधिकारी आंबरे.दातीर चव्हाण. रमेश गाडे यानी सहभागी शेतकऱ्यांचे स्वागत केले.नियोजनबद्ध आणि महितीपूर्ण कार्यक्रमामुळे सहभागी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments