शिर्डीत गुरुपूर्णिमा उत्सवाच्या तीन दिवसात साई संस्थांनला सात कोटी 81 लाख रुपये देणगी झाली प्राप्त --मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर

शिर्डी( राजकुमार गडकरी)--

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेच्या वतीने बुधवार दि. २८ जुलै २०२६ ते शुक्रवार दि. ३० जुलै २०२६ या कालावधीत आयोजित केलेल्‍या श्री गुरूपौर्णिमा उत्‍सवामध्‍ये रुपये ०७ कोटी ८१ लाख १३ हजार ३७७ इतकी देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

 सदर देणगी मध्‍ये रोख स्‍वरुपात रुपये ०२ कोटी ०४ लाख ३५ हजार ५५७ दक्षिणा पेटीत प्राप्‍त झाली असून, देणगी काऊंटरवर ०१ कोटी २५ लाख ४७ हजार ९३५ रुपये, पी.आर.ओ.देणगी ८७ लाख १४ हजार, डेबीट क्रेडीट कार्ड,ऑनलाईन देणगी, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर असे एकूण ०२ कोटी ०७ लाख ८४ हजार ७०१ रुपये, परकीय चलनाद्वारे ०५ लाख ६५ हजार ९९१ रुपये, सोने १,१२५.५७० ग्रॅम प्राप्‍त झाले असून त्‍याचे मुल्‍य रक्‍कम रुपये ०१ कोटी ४६ लाख ७४ हजार ५४४ व चांदी २,३७६.५०० ग्रॅम प्राप्‍त झाली असून तीचे मुल्‍य रक्‍कम रुपये ०३ लाख, ९० हजार ६४९ असे आहे.  
श्री गुरूपौर्णिमा उत्‍सव कालावधीत साधारणतः ०३ लाखाहून अधिक साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. उत्‍सव कालावधीमध्‍ये श्री साईप्रसादालयाद्वारे सुमारे ०१ लाख ९४ हजार २८५ साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा तर ३९,६११ अन्‍नप्रसाद पाकिटांचा लाभ घेतला. दर्शन रांगेत ०१ लाख ६५ हजार २०० साईभक्‍तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्‍यात आले. या कालावधीत ७१ लाख ०७ हजार ३६० रूपये सशुल्‍क प्रसादरुपी लाडू पाकीटांच्‍या माध्‍यमातून प्राप्‍त झाले. उत्‍सव काळात हजारो साईभक्‍तांनी संस्‍थानच्‍या साईप्रसाद निवासस्‍थान, साईबाबा भक्‍त निवासस्‍थान, व्‍दारावती निवासस्‍थान, साई आश्रम भक्‍तनिवास व साईधर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेकरीता उभारण्‍यात आलेल्‍या मंडपात निवास व्‍यवस्‍थेचा लाभ घेतला. तसेच साईधर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्‍या ३९ पालख्‍यांमधील पदयात्री साईभक्‍तांनी निवास व्‍यवस्‍थेचा लाभ घेतला. असे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments