सावळीविहीर बु. येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व क्रांतीसुर्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी!

शिर्डी ( प्रतिनिधी)-
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे दिन दलित बहुजनांचे कैवारी, लोककवी ,समाज सुधारक आणि लेखक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व क्रांतीसुर्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी एक ऑगस्ट रोजी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करत विविध कार्यक्रमानी साजरी करण्यात आली.

एक ऑगस्ट रोजी सकाळी प्रथम सावळीविहीर बुद्रुक येथे ग्रामपंचायत,तसेच शिवसेना(उबाठा) व विविध संघटनेच्या, संस्थेच्या वतीने येथे सर्वजण एकत्रित येऊन सर्वांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून घोषणा देत जयजयकार करण्यात आला. तसेच त्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक च्या ठिकाणी येऊन पुष्पहार अर्पण करत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला

 व त्यानंतर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतीसुर्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे सरपंच ओमेश जपे, उपसरपंच दत्तात्रय आगलावे, मा, उपसरपंच विकास तुपे,मा. उपसरपंच गणेश कापसे, राहता तालुका शिवसेना प्रमुख संदीप दिघे, शहर प्रमुख दिनेश आरणे , त्याचप्रमाणे इतर विविध मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतीसुर्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जयजयकार करण्यात आला. यावेळी सरपंच ओमेश जपे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती चळवळीत मोठी भूमिका बजावल्याचे सांगितले. तर शिवसेना(उबाठा) गटाचे राहाता तालुका प्रमुख संदीप रमेश विघे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साहित्य आणि लेखन कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकार लेखन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरी करते. त्यांचे कार्य खूप महान आहे. असे सांगत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा प्रसिद्ध नारा देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे लाल बाल पाल या त्रिकुटातील एक प्रमुख स्वातंत्र्य सेनानी होते. असे यावेळी सांगितले. तर दिनेश आरणे यांनी सांगितले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दिन दलित बहुजनांचे कैवारी होते. लोककवी होते. आपल्या कविता,पोवाडा व लेखणीतून त्यांनी समाज सुधारण्याचे मोठे काम केले. असे सांगितले. यावेळी सर्व उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व क्रांतीसुर्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला बबनराव आरणे , एकनाथ आरणे, किरण जपे, निलेश आरणे, आनंद जपे, राजू कापसे, कारभारी पाचोरे, मुकेश वाघमारे, स्वप्निल पारडे, कैलास पळसे, विवेक जपे, बाळासाहेब काशिद,शरद गडकरी, बाळासाहेब आरणे, आदींसह विविध संस्थांनचे कार्यकर्ते, शिवसैनिक, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments