चायना मांज्यावर बंदी आणून कठोर कारवाई कराभारतीय लहुजी सेनेचे श्रीरामपूर पोलीस स्टेशनला निवेदन


श्रीरामपूर( | प्रतिनिधी)

श्रीरामपूर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या घातक चायना मांज्यावर तात्काळ बंदी घालून त्याची विक्री, साठवणूक व वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने श्रीरामपूर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. यावेळी एपीआय सिकरे साहेब यांनी निवेदन स्वीकारले.
चायना मांज्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी, लहान मुले तसेच निरपराध पक्ष्यांचे जीव धोक्यात येत असून अनेक ठिकाणी गंभीर अपघात घडत आहेत. शासनाने स्पष्टपणे बंदी घातलेली असतानाही काही विक्रेते व नागरिक बेकायदेशीररीत्या चायना मांजाची विक्री व वापर करत असल्याने सार्वजनिक सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
या निवेदनावर भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचिव हनिफ भाई पठाण, राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, जिल्हा प्रमुख रईस शेख, युवा नेते विशाल मोजे, पत्रकार किशोर भाऊ गाढे, सिकंदर तांबोळी, शिवस्वराज्य मंचचे अध्यक्ष सलमान पठाण, संदीप सेठ शेडगे तसेच रमिज पोपटिया यांनी स्वतः सही करून पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर केले.
यावेळी चायना मांजाची विक्री करणाऱ्या दुकानांवर व गोदामांवर तात्काळ छापे टाकावेत, दोषींवर कडक दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सातत्याने मोहीम राबवावी, अशी ठोस मागणी करण्यात आली.
निवेदनाची गंभीर दखल घेऊन त्वरित व प्रभावी कारवाई करण्यात यावी, अन्यथा भारतीय लहुजी सेनेच्या वतीने श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचिव हनिफ भाई पठाण व राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी यावेळी दिला.

Post a Comment

0 Comments