टाकळीभान प्रतिनिधी-राहुरी नगरपालिकेचे नगरसेवक पदाची पंचवीस वर्षाची विजयाची परंपरा ,लोहार समाजाचे भूषण पोपळघट कुटुंबाने नूतन नगरसेवक केतन दशरथ पोपळघट यांचा निवडणुकीत विजय होऊन परंपरा जोपासली ,
त्यांचा सत्कार लोहार समाजाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार दिलीपराव लोखंडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला,
याप्रसंगी राहुरी नगरपालिकेचे माजी उपानगरध्यक्ष दशरथ दादा पोपळघट , राहुरी नगरपालिकेच्या माजी नगरअध्यक्ष सौ, अनिताताई पोपळघट, सोमनाथ जवणे, महेश पोपळघट, श्रीमती,भाग्यत्रीताई थोरात,सौ, श्रद्धा पोपळघट, सौ, उज्वला पोपळघट, प्रमुख उपस्थित होते,
यावेळी नूतन नगरसेवक केतन पोपळघट यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले राहुरीतील नागरिकांनी मला माझ्या कुटुंबाला गेल्या पंचवीस वर्षापासून भरभरून प्रेम करत आले आहे , म्हणून मी विजयाची परंपरा राखून ठेवले आहे, मी हे कधीच विसरणार नाही व जनतेची सेवा करीन, जनतेचा विकास हाच माझा ध्यास राहील, असे यावेळी म्हणाले.
0 Comments