शिर्डी ( प्रतिनिधी) मानवी मनाचे तीन अदृश्य बंध असून त्या
संपत्ती (वित्तेशना), वारसा (पुत्रेशना), आणि कीर्ती (लोकेशन) आहेत . हि तीन अदृश्य बंधने आसक्ती माणसाला प्रपंचाच्या दलदलीत अडकवते. या तीन अदृश्य बंधनातून मुक्त झाला तर नक्कीच ईश्वरी आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही.
असे महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी म्हटले आहे. प्रत्येक मानवी मनामध्ये तीन अदृश्य बंध असून वित्तेशना म्हणजे संपत्ती ,वारसा म्हणजे पुत्रेशना आणि लोकेशन म्हणजे कीर्ती या तीन बंधनांतून मुक्त होऊनच अनेक जण संत महंत झाले.जे संत पुरुष झाले, त्यांचं जीवन म्हणजे या इष्णांचा म्हणजे या तीन अदृश्य बंधनांचा त्याग कसा करावा याचं जिवंत उदाहरण आहे.तुकाराम महाराज शेतकरी होते. कुटुंब, व्यवसाय, आणि समाज सगळं काही होतं. परंतु एकाएकी दुष्काळाने त्यांचं संपूर्ण धन गेलं. संसार ढवळून गेला, पण त्यातूनच तुकारामांनी वैराग्याची वाट धरली. या दुष्काळाने माझं बरच केलं.
माझे माजघर जे तोडीले,
माझे कोठे जे उध्वस्त केले।
तया पांडुरंगाने निर्मळ केले
माझे चित्त।"
धन गेलं म्हणून ते खचले नाहीत, उलट म्हणाले होते की,
"सांडीली शेती, वास केला तीर्थी।"
हीच ती वित्तेशनेपासून म्हणजे संपत्ती पासून झालेली खरी सुटका. असे ते म्हणत होते.
तर दुसरे अदृश्य बंध पुत्रेशना म्हणजे वारसा होय.
एकनाथ महाराजांचे पुत्र, संतण्णा, खूप प्रिय होते. परंतु एकनाथांनी कधीही “माझा वंश चालावा” या मोहात धर्मत्याग केला नाही. त्यांचे उपदेश 'ज्ञानेश्वरी', 'भावार्थ रामायण' याच्या धर्तीवर असले तरी त्यांनी लौकिक आश्रय न धरता, संतत्वाचा वारसा उभा केला.
एकनाथ महाराज म्हणतात :
"पुत्रांवरी प्रेम धरू नये,
तो आपुला जीव गिळी।"
असाच त्याग रामकृष्ण परमहंसांनी केला होता. जेव्हा विवेकानंदांसारखा पुत्रतुल्य शिष्य मिळाला, तेव्हा त्यांनी खऱ्या अर्थाने पुत्रेशनेचा आत्मिक परिष्कार केला होता.तर
तिसरे अदृश्य बंध लोकेशन म्हणजे कीर्ती होय. संत ज्ञानेश्वर महाराजांचे ज्ञान, कविता, तत्त्वचिंतन सर्व थोर होतं. पण त्यांना “लोकांनी मोठं मानावं” याची इच्छाही नव्हती. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी त्यांनी संजिवन समाधी स्वीकारली. कारण त्यांनी लोकेशन म्हणजे कीर्ती या इष्णेचा पूर्णतः त्याग केला होता.
माझं काही नाही, सर्व काही पांडुरंगाचं"आहे .ही त्यांची भावना होती.
त्यानंतर त्यांच्या संत परंपरेतील बहीण मुक्ताबाई म्हणते,
"लोक म्हणती हा कीर्तीमंत
पण त्याची कीर्ती झाली अंतःकरणात!"
कल्पना करा एक नदी आहे. तिचे नाव माया नदी. तिच्यात तीन झरे मिळतात – वित्तेशना, पुत्रेशना, लोकेशन.जो यात पोहत राहतो, तो पुनर्जन्माच्या भोवऱ्यात अडकतो.
पण जो या झऱ्यांच्या उगमाकडे पाहतो, त्या इच्छांचे मूळ शोधतो, त्याला त्या झरे सुकवण्याची कला येते.
तो मग हि माया नदी पार करतो. आणि ब्रह्मपदाच्या तीरावर पोहचतो.
या तीन इष्णा म्हणजे ‘माझं आहे’ या कल्पनेचा विस्तार आहे.
पण जेव्हा साधक म्हणतो “मी नाही, मी फक्त साक्षी आहे”, तेव्हा त्याच्या इच्छा क्षीण होतात.
तेंव्हा वित्ताची आस कमी होऊ दे, पुत्राच्या मोहातून निघू दे,लोकसंग्रहाची खोटी कीर्ती दूर होऊ दे, हेच परमेश्वराकडे मागणे आहे. असे मंहत आत्माराम गिरीजी महाराज यांनी म्हटले आहे.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments