राजकुमार गडकरी
त्यांच्या चौथ्या पुण्यस्मरणा निमित्त ह भ प कविताताई साबळे यांचे सायंकाळी सात ते आठ वाजे दरम्यान सावळीविहीर बुद्रुक तालुका राहता येथील कारवाडी जपे वस्तीवर प्रवचन होणार आहे. कै. नवनाथ भीमराज पाटील जपे हे सावळीविहीर बुद्रुक येथील सर्व परिचित असे व्यक्तिमत्व होते. धार्मिक कार्यक्रमात त्यांचा नेहमी सिंहाचा वाटा असे. श्री साई चरित्र पारायण असो, हरिनाम सप्ताह असो, श्री परशुराम महाराज यात्रा सो, कारवाडी येथील देवीची यात्रा असो , की कोणताही उत्सव असो यामध्ये त्यांचा हिरारीने सहभाग नेहमी असायचा, किर्तन प्रवचन, भजन ,हरिपाठ यामध्ये त्यांना मोठा रस होता. ते पहिल्यापासूनच धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे त्यांचा धार्मिकतेकडे अधिक ओढा होता. त्यामुळे अनेक धार्मिक कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावात पार पडले होते. सुसंस्कृत, सुशिक्षित असणारे, स्पष्ट वकृत्व असणारे, साधे सरळ व सर्वांशी आपुलकीने बोलणारे, लहान, तरुण, वयस्कर आदी शी मैत्रीसारखे संबंध जपणारे, साधी सरळ राहणीमान, व सर्वांशी आपुलकीने बोलणारे, कै. नवनाथ भीमराज जपे पा. हे गावातच नव्हे तर तालुक्यातही एक प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व होते. म्हणूनच कै. नवनाथ पाटील जपे हे सर्व सावळीविहीर गावचे आप्पा होते. त्यांना गावात आप्पा या नावाने संबोधले जात होते. त्यांनी आपल्याबरोबरच आपले सर्व कुटुंब, तसेच आपला मित्रपरिवार, नातेवाईक, भाऊबंद यांना सर्वांना नेहमी चांगले मार्गदर्शन केले. ते निस्वार्थी, निर्व्यसनी होते असे सर्वांचे आप्पा यांचे चौथे पुण्यस्मरण शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी कारवाडी, सावळी विहीर बुद्रुक तालुका राहाता येथे आहे. आप्पा आपल्यातून गेले मात्र त्यांच्या आठवणी कायम आहेत. त्यांचे अनेक कीर्तनकार ,प्रवचनकार, साधुसंत यांच्याबरोबर मोठे आपुलकीचे संबंध होते. त्यामुळे अशा धार्मिक वृत्तीच्या कै.नवनाथ भीमराज पाटील जपे यांच्या चौथ्या पुण्यस्मरण निमित्त अनेक साधुसंत व महाराजांनीही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. सावळीविहीर व परिसरातूनही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments