दिलीप लोखंडे
टाकळीभान (प्रतिनिधी- )याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील बेलापूर-पढेगाव रोड परिसरात एका ठिकाणी खराब झालेला वीजेचा प्रवाह दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या मुकेश नावाच्या तरुणाला काल दुपारी चारच्या सुमारास लाईटीच्या खांबावर काम करीत असताना शॉक लागला.
त्यानंतर त्याला ताबडतोब पुढील उपचारासाठी श्रीरामपूर शहरातील कामगार हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आले.त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले आहे.दरम्यान मुकेश नावाचा हा तरुण खाजगी कंत्राटदाराकडे काम करतो अशी माहिती मिळत आहे.
0 Comments