श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र पैठण अशा पायी दिंडी सोहळाचे हभप संजयजी महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तीन ते दहा मार्च या कालावधीत आयोजन!

राजकुमार गडकरी 

शिर्डी( प्रतिनिधी)- दरवर्षाप्रमाणे यावर्षीही श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र पैठण असा पायी दिंडी सोहळा प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजयजी महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तीन मार्च ते दहा मार्च 2026 या कालावधीत आयोजित केला आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 


 या पत्रकात म्हटले की, मंगळवार तीन मार्च 2026 रोजी सकाळी दहा वाजता श्रीक्षेत्र भऊर ता. वैजापूर येथील श्री रोकडेश्वर हनुमान महाराज मंदिर येथून या दिंडी सोहळ्याचे प्रस्थान पालखीचे पूजन करून होणार आहे. 
मजल दर मजल करत हरिनामाच्या गजरात हा पायी दिंडी सोहळा 8 मार्च रोजी नारळा पैठण येथे पोहोचणार आहे. रस्त्यात तीन मार्च रोजी वराडे वस्ती, शिरसगाव, 5 मार्च रोजी साईनाथ मोरे ,पुरी ता. गंगापूर, 4 मार्च रोजी वैष्णवी ट्रेडिंग कंपनी मांजरी फाटा ,6 मार्च रोजी ज्ञानेश्वर अर्जुन भवर शेकटा ता.पैठण व सात मार्च रोजी भागचंद्र दशरथ बोबडे इसारवाडी तालुका पैठण येथे दिंडीचा मुक्काम राहणार आहे. त्यानंतर आठ ते दहा मार्च 2026 पर्यंत दिंडी विसाव्याचे ठिकाण हे अमोल भागवत वडेकर नगर ,नारळा, पैठण येथे राहणार आहे. 

रस्त्यात मुक्कामाच्या ठिकाणी आरती, भजन, हरिपाठ ,प्रवचन ,कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. आठ मार्च रोजी नारळा पैठण येथे गोयेगाव भऊर यांचा रात्री आठ वाजता संगीतमय भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. 9 मार्च रोजी हभप संजयजी महाराज जगताप यांचे सायंकाळी सहा ते आठ या वेळेत कीर्तन होणार आहे. तर 10 मार्च रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत हभप संजयजी महाराज जगताप यांचेच काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर श्रीक्षेत्र भऊर येथील एडवोकेट प्रमोद (दादा )मुरलीधर जगताप यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. व या दिंडी सोहळ्याची येथे सांगता होणार आहे.त्याचप्रमाणे बुधवार दिनांक 11 मार्च 2026 रोजी सकाळी नऊ वाजता सद्गुरु संत श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या सतराव्या पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र सरला बेट अशा पायी दिंडी सोहळ्याचे ह भ प संजयजी महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे. तरी वारकरी भजनी मंडळी ,व भाविकांनी ,या दिंडी सोहळ्यात व धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे. या दिंडी सोहळ्यासाठी विविध भजनी मंडळे , गायक मृदंगाचार्य, वारकरी भाविक,ग्रामस्थ या सर्वांचेच मोठे सहकार्य असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments