थोर क्रांतिकारक =विनायक दामोदर सावरकर
....==. ने मजसी ने परत मातृभूमीला !सागरा प्राण तळमळला!==
अगणित राष्ट्रभक्ती आणि राष्ट्र प्रेमाने सागराला तळमळून प्रार्थना करणारा ;मातृभूमीच्या सेवेसाठी मातृभूमीच्या भेटीसाठी सतत तळमळणारा; एक झुंजार नेता भारत मातेचा थोर सुपुत्र म्हणजे विनायक दामोदर सावरकर होय: विनायक दामोदर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगुर या छोट्याशा गावामध्ये झाला. वडिलांचे नाव दामोदर तर आईचे नाव राधाबाई असे होते. विनायक अवघ्या दहा वर्षाचा असतानाच त्याची आई देवा देवा घरी गेली होती. सावरकरांचे आईवर अतूट असे प्रेम होते.
स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्य तिथीनिमित्तमोठे होऊन त्यांना आपले आईची सेवा करायची होती. परंतु त्यांचे ते स्वप्न पूर्ण झाले नाही. विनायक दामोदर सावरकर हे फार संवेदनशील मनाचे होते. त्यांचं हृदय हे कवीचं होतं. त्यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांची स्मरणशक्ती देखील खूप दांडगी होती. विनायक दामोदर सावरकर हे कविता देखील करत असत. विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक जिल्ह्यातील भगूर गावी एका छोट्या शाळेत आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केल. ते अतिशय हुशार होते. पुढील शिक्षणासाठी त्यांचे वडिलांनी त्यांना नाशिक येथे पाठवले. नाशिक सारख्या मोठे शहरात शिक्षण घेतल्यामुळे सावरकरांचा अधिक फायदा झाला. शहरी भागात शिक्षण घेतल्यामुळे त्यांच्या कार्याच्या दिशा उंचावल्या. त्यांना समाज विषयी आदर ;आपुलकी; सहानुभूती त्यांच्या अंतकरणात निर्माण झाली. भरपूर वाचन: चिंतन :मनन यामधून त्यांच्यामधील वक्तृत्व आणि लेखन शैली आणि काव्य गुण देखील बाहेर पडले. आपला देश ब्रिटिश पार तंत्र्यात आहे. आणि त्यासाठी चालू असलेल1 857 पासून चा स्वातंत्र्यसंग्राम; देश स्वातंत्र्यासाठी होणारे उठाव; त्याकरिता पडणारे भारतीयांचे कित्येक बळी; स्वातंत्र्य करिता आपल्या प्राण्यांचे बलिदान देणारे देशभक्त या सर्वांचा त्यांच्या संवेदनशील मनावर फार मोठा परिणाम झाला. . ........... ............ आपल्या मातेची सेवा करण्याची त्यांची इच्छा अधुरी राहिली म्हणून की काय त्यांनी देश सेवा करण्याचा निर्धार बांधला. मातृभूमीची सेवा करण्याचा निश्चय केला. आपल्या समविचारी मित्रांच्या बरोबर त्यांनी कुलस्वामिनी पुढे मातृभूमीच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत झटेल. आणि शेवटच्या श्वासापर्यंत माघार घेणार नाही.
अशी प्रतिज्ञा सावरकरांनी केली. एक जानेवारी 1900 साली सावरकरांनी ^मित्रमेळा^ या नावाची एक संस्था स्थापन केली. राष्ट्रभक्ती आणि राष्ट्र सेवा करणे हेच प्रमुख ध्येय सावरकरांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवले होते. सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक येथे एकत्र करून दामोदर सावरकरांनी आपले विचार लोकांपुढे मांडायला सुरुवात केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे अतिशय प्रखर होते. ते जहाल मतवादी होते. त्यांना देशाचे स्वातंत्र्य हे स्वतःच्या मंनगट बळावर मिळवायचे होते. त्यांना कोणाच्या दयेवर करूनेची भीक नको होती. सावरकरांच्या मनावर लोकमान्य टिळक. आगरकर. गोखले यांच्या प्रखर विचारांचा परिणाम झाला. ब्रिटीशक्तीविरुद्ध केलेल्या परदेशी कपड्यांच्या होळी कार्यक्रमात सावरकरांनी सक्रिय सहभाग घेतला होता. इंग्रजांविरुद्ध त्यांनी मोठ्या प्रमाणात घडा दिला. 1905साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बी ए ची परीक्षा दिली. त्यांचे अतिशय जहाल अशा प्रकारचे लेख वर्तन पत्रातून प्रसिद्ध होऊ लागले .त्यांची प्रभावी भाषणे गाजू लागली. समाजही त्यांच्या वतृत्वाने अतिशय प्रभावीत झाला .पण सावरकर मात्र इंग्रज सरकारच्या डोळ्यावर आले .इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या सावरकरांनी ^फ्री इंडिया सोसायटी ^संस्था निर्माण केली. ब्रिटिश सत्ता ही उलथून टाकली पाहिजे. ब्रिटिशांना आपल्या देशातून हुसकावून दिलं पाहिजे. अशा प्रकारची तीव्र तळमळ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मनामध्ये होती. ब्रिटिशांच्या विरोधात^ मारू किंवा मरू^ अशा प्रकारची घोषणा सावरकरांची होती. इंग्लंडमध्ये राहून सावरकर हे भारतीयांना मदत करत आहे भारतातल्या बॉम्बस्फोट यांच्याशी सावरकरांचा मोठा संबंधआहे. हे ब्रिटिशांच्या लक्षात येताच सावरकरांना अटक करण्यात आली. ब्रिटिशांनी त्यांच्यावर खटला चालवला आणि सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा देण्यात आली. शिक्षेसाठी बोटीतून त्यांना नेत असताना त्यांनी समुद्रात उडी मारून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाडस हे मात्र अतिशय कौतुकास्पद असे होते. काळे पाण्याची शिक्षा भोगायला त्यांची रवानगी अंदमान येथे करण्यात आली. अंदमानातील तुरुंगात ही शिक्षा भोगणे हे काही सोपे नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थिती देखील सावरकरांनी आपलं कवी मन जिवंत ठेवल. अंदमान बेटावरती काळ्या** पाण्याची शिक्षा भोगत असताना आपल्या मातृभूमीबद्दल अतुट अशा प्रकारचे प्रेम अंतकरणात असल्यामुळे सहजच त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले ते असे ^ने मजसी ने परत मातृभूमीला! सागरा प्राण तळमळला^ यावरून सावरकरांच्या अंतकरणात आपल्या भारत भूमीबद्दल अतुट अशा प्रकारचे प्रेम होते. अशाप्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकर भारत मातेची सेवा अविरत करत राहिले. भारत मातेची सेवा करत असतानाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्राणज्योत 26 फेब्रुवारी 1966 रोजी मालवली. संपूर्ण देश शोक सागरात बुडाला .त्या महान स्वतंत्र्यवीराला माझा मानाचा मुजरा.
स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुण्य तिथी निमिताने मी माझ्या सर्व देश बांधवांना नम्र पने सूचित करू इच्छितो की. काही अंशी तरी आपण या थोर महात्म्याच्या विचारांचे अनुकरण करावे..यातून आपला देश प्रगतीपथावर तर आहेच. परंतू तो अधिक शिगेला पोहचल्याशिवाय राहणार नाही. असे माझे प्रामाणिक मत आहे.
=जयहिंद.
प्रा ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे सर
साकुरी. =ता.राहता=. जिल्हा= अहिल्या नगर
मो.9604797316
....
0 Comments