टाकळीभान(प्रतिनिधी)—श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील श्रीराम मंदीर पायी दिंडी व श्री साईबाबा मंदीर पायी दिंडी पालखीचे पंढरपूरकडे शनिवारी मोठ्या उत्साहात व भक्तीभावात प्रस्थान झाले. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने फटाक्यांच्या आतषबाजीत दिंडीचे स्वागत करण्यात आले. या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने महिला व पुरूष मंडळींनी आपला सहभाग नोंदविला होता. वैष्णवांचा मेळा, हातात भगव्या पतका, टाळमृदूगांच्या निनादाने प्रतिपंढरपूर म्हणून ओळखली जाणारी टाकळीभान नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली होती.
याप्रसंगी बाजार समीती माजी सभापती नानासाहेब पवार मित्रमंडळाच्या वतीने तसेच बाजार समिती उपबाजार आवारात संचालक मयुर पटारे, विलास दाभाडे यांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिर दिंडी व श्री साईबाबा दिंडीचे स्वागत करून वारकर्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी अशोकचे माजी संचालक लक्ष्मण उर्फ भाऊ पाटील थोरात, सेवा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष राहुल पटारे, कारेगाव भागचे संचालक शिवाजीराव शिंदे,भाऊसाहेब मगर,, अनिल बोडखे, संजय रणनवरे, बापूसाहेब शिंदे, सुनिल बोडखे, बंडोपंत बोडखे, भाऊसाहेब पटारे, अशोक शिंदे, मोहन रणनवरे, अविनाश लोखंडे, एकनाथ पटारे, रिपाईचे आबासाहेब रणनवरे, प्रा.जयकर मगर आदी उपस्थित होते.
0 Comments