टाकळीभान येथील श्रीरामपूर नेवासा रोड हद्दीची मोजणी दोन दिवसात अतिक्रमण काढण्याचा इशारा, अन्यथा सार्वजनिक बांधकाम खाते पोलीस संरक्षणात काढणार

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी: श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान मधून जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग क्रमांक ५० श्रीरामपूर नेवासा रोडच्या दुतर्फा केलेले व्यावसायिक व तात्पुरते रहिवासी यांनी केलेले अतिक्रमण शासनाच्या नियमाप्रमाणे दोन दिवसांमध्ये बुधवारपर्यंत न काढल्यास सार्वजनिक बांधकाम खाते पोलीस संरक्षणामध्ये अतिक्रमण काढणार असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

 सोमवार दि.६ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग क्रमांक ५० टाकळीभान येथील श्रीरामपूर नेवासा रोड वरील रस्त्याच्या दुतर्फ मोजणी करून आपल्या हद्दीची आखणी केली. अतिक्रमणधारकांनी बऱ्याच अंशी अतिक्रमण काढले असून अजूनही काही व्यावसायिक व रहिवासी याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दी मध्ये मध्ये अतिक्रमण असून ते त्वरित दोन दिवसात काढावे अन्यथा पोलीस संरक्षणात काढण्यात येईल असा गर्भित इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. बऱ्यच अंशी अतिक्रमण काढण्यात आले असून उर्वरित अतिक्रमण असणाऱ्या व्यवसायिक व रहिवाशांना आपले अतिक्रमण न काढल्यास शासनाच्या कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. 

चौकट: शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाने जे अतिक्रमण मध्ये असतील त्या सर्वांना अतिक्रमण काढण्यास बजावावे कोणावरही अन्याय न होता,छोटा मोठा, राजकीय पाठबळ असलेले असा भेदभाव न करता शासनाने कोणाचीही गय न करता अतिक्रमण केलेल्या सर्वांचे समान नियमाप्रमाणे अतिक्रमण काढावे अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments