श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील खिर्डी येथे गायरान जमिनीवरील अतिक्रमण आणि विटभट्टी उभारण्याच्या वादातून घरात घुसून मारहाण, जातीवाचक शिवीगाळ, महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून या बाबात दाखल फिर्यादीवरून आठ जणांवर अॅट्रोसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, गावातील गायरान जमीनीत अनेकांचे अतिक्रमण आहे. या जमीनीत फिर्यादीने अतिक्रमण करून विटभट्टी चालू करण्यासाठी साहित्य टाकले. मात्र खिर्डीतील राहुल विठ्ठल धायगुडे व इतरांनी विरोध केला. बेकायदेशिर जमाव जमवून घरात घूसून थक्काबुक्की केली. मुलास विट मारून दुखापत केली व आम्हास जातीवाचक शिवीगाळ करून महिलेचा विनयभंग केला. सर्वांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
वरील फिर्यादीवरून राहुल विठ्ठल धायगुडे, पंकज विठ्ठल धायगुडे, विशाल भगवान म्हसाळ, जालु सोमनाथ देवकाते, बाबासाहेब भाऊसाहेब हळनोर, जना विटनोर, सिध्दार्थ पारखे, बाबु हळनोर (सर्व राहणार खिर्डी, ता. श्रीरामपूर) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 74,333, 118(1), 115(2),352, 351(2), 351(3),189(2), 191(2),191(3),190 तसेच अनुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3 (1) (थ) (ळ), 3 (1) (ी), 3 (1) (ी) , 3 (2) र्(ींर) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
--
0 Comments