टाकळीभान प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान जवळील खिर्डी येथील रहिवासी आणि प्रभावी संगीत संयोजक आणि रेकॉर्डिंस्ट संतोष सरोदे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या अष्टपैलू संगीत कौशल्याची दखल घेत त्यांना 'साई प्रेरणा गौरव पुरस्कार २०२६' अंतर्गत 'उत्कृष्ट संगीत संयोजक ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'माहेरची साडी' या अजरामर चित्रपटातून घराघरांत पोहोचलेल्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री अलका कुबल यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सिनेसृष्टीतील एवढ्या मोठ्या ज्येष्ठ अभिनेत्रीकडून मिळालेली ही दाद संतोष सरोदे यांच्या आजवरच्या प्रवासाला मिळालेली अत्यंत मानाची पावती ठरली आहे.
ग्रामीण भागातून पुढे येत आपल्या कौशल्याच्या जोरावर राज्यस्तरीय व्यासपीठावर 'साई प्रेरणा गौरव पुरस्कार २०२६' पटकावल्याबद्दल आणि अलका कुबल यांच्या हस्ते सन्मानित होण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल संगीतकार आणि रेकॉर्डिस्ट संतोष सरोदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. खिर्डी, टाकळीभान परिसरासह संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यातून राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
0 Comments