टाकळीभान प्रतिनिधी: श्रीरामपूर
तालुक्यातील टाकळीभान येथे वटसावित्री पोर्णिमा उत्सव सोमवार दि.२९ जुन रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वडाच्या झाडाला फेर्या मारून विवाहीत महिलांनी पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणी दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पुजा करून अखंड सौभाग्याची प्रार्थना केली. हिंदू पौराणीक कथेनूसार सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीचे
म्हणजेच सत्यवानाचे प्राण परत मिळविले होते. त्या स्मरणार्थ सुवासिनींकडून हे व्रत केले जाते. यावेळी महिलांनी वटवृक्षाला हळदी कुंकू वाहून सुत किंवा मौली गुंडाळून प्रदक्षिणा घातल्या. तसेच वटसावित्री व्रताची पौराणीक कथा वाचून उपवास पुर्ण केला. पुजेप्रसंगी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करून सुवासिनींनी वटवृक्षाभोवती मोठी गर्दी केली होते.
परिधान केलीली वेशभूषा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. यंदा वटसावित्री पोर्णिमेवर पहाटे ३.०७ ते दुपारी ४.१७ पर्यंत भद्रा काळ असल्याचे बोलले जात होते. मात्र ज्योतीष शास्त्रानूसार त्याचा पुजेवर कुठलाही परिणाम होणार नसल्याने मोठ्या उत्साहात सुवासिनीनी वटवृक्षाची मनोभावे पुजा केली.
0 Comments