टाकळीभान ग्रामपंचायतीची फेर आरक्षण सोडत जाहीर


 
टाकळीभान प्रतिनिधी- टाकळीभान ग्रामपंचायत पंचवार्षिक सदस्य मंडळाच्या निवडणुकीसाठी फेर आरक्षण सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली. १० जुन रोजी झालेल्या सोडतीत चुका झाल्याने ग्रामसभाच रद्द करण्याचा ठराव करण्यात आला होता. मागील झालेल्या सोडतीत फेरबदल झाल्याने काही इच्छुकांमध्ये नाराजी दिसुन आली तर काहींच्या चेहऱ्यावर हसु फुटले.
आरक्षण सोडत चिठ्ठी टाकुन पारदर्शक पध्दतीने करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
    गेले काही दिवस रखडलेली ग्रामपंचायतीची निवडणुक पुर्व तयारी टप्याटप्याने सुरु करण्यात आलेली आहे. सरपंच आरक्षण सोडत, प्रभाग रचना व आता प्रभागातील सदस्यांची आरक्षण सोडत पार पडली आहे. गेल्या १० जुन रोजी सदस्य प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली होती. मात्र त्यात चुका झाल्याने ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने या सोडतीवर ग्रामसभा रद्द करण्याचा ठराव करुन सोडतीवर हरकत घेण्यात आली होती. त्यामुळे काल सोमवार २९ जुन रोजी पंचायत समितीचे सांख्यकि विभागाचे विस्तार अधिकारी दिनकर ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकसंख्येच्या टक्केवारी नुसार व चक्राकार पध्दतीने काही ठिकाणी चिठ्ठी टाकुन काढण्यात आली. पारदर्शक आरक्षण सोडत
ग्रामसचिवालयाच्या खा. गोविंदराव आदिक सभागृहात काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत सहा प्रभागातील सतरा सदस्यांसाठी आरक्षण सोडत पार पडली.
   त्यानुसार प्रभाग १ मध्ये अनु. जाती पु., ना.मा.प्र.पु., सर्वसाधारण स्त्री. प्रभाग २ मध्ये ना.मा.प्र. स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण पु. प्रभाग ३ मध्ये अनु. जमाती
पु., आनु. जाती स्त्री, सर्वसाधारण पु. प्रभाग ४ मध्ये दोन सदस्य असल्याने अनु. जाती पु., सर्वसाधारण स्ञी. प्रभाग ५ मध्ये अनु. जाती स्त्री, ना.मा.प्र. स्त्री, सर्वसाधारण पु, प्रभाग ६ मध्ये सर्वसाधारण स्त्री दोन व सर्वसाधारण पु. असे आरक्षण टाकण्यात आले आहे. आरक्षण सोडतीकामी ग्राममहसुल आधिकारी रुपाली रामटेके व ग्राममहसुल आधिकारी किसन भिंगारदे यांनी विशेष सहकार्य केले.
     यावेळी सरपंच अर्चना रणनवरे, कान्हा खंडागळे, राजेंद्र कोकणे, शिवाजी शिंदे, विलास दाभाडे, जयकर मगर, राहुल पटारे, नारायण काळे, सुनिल बोडखे, पवन मगर, ज्ञानेश्वर कोकणे, अनिल कोकणे, अनिल बोडखे, बापुसाहेब शिंदे भारत भवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ईयत्ता पहीलीचा विद्यार्थी राजवर्धन किशोर आहेर याच्या हस्ते ईश्वरीय चिठ्या काढण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments