राहाता तालुक्यातील शिर्डी जवळील सावळीविहीर बुद्रुक या छोट्या गावातील आकाश वाघमारे हा तरुण कलाकार मोठ्या जिद्दीने व आपल्या मेहनतीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवून सातत्याने यशाची मोठी भरारी घेत असून त्यांनी आपल्या शाळा, महाविद्यालयातही एकांकिका, नाटिका नाटक आदींमध्ये सहभाग घेऊन मोठ्या जिद्दीने व्यावसायिक नाट्यसृष्टीमध्ये, चित्रपटसृष्टीमध्ये ही प्रवेश केला असून या क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतली आहे. प्रेम या चित्रपटामध्ये आकाश वाघमारे आपल्याला मुख्य भूमिकेत दिसून येणार असून त्यांची नाट्यरंग या मोठ्या व्यावसायिक नाटकातही मोठी भूमिका आहे. कला क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य बघून व अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामाची दखल घेऊन त्यांना नुकताच साई प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शिर्डी येथे नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमांमध्ये त्यांना फिल्म क्षेत्रातील कामाची दखल घेऊन हा मानाचा, अभिमानाचा पुरस्कार जेष्ठ मराठी अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. कलाकार आकाश वाघमारे यांना ज्येष्ठ मराठी अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते सन्मानचिन्हे, प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. हा अभिनय क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे अभिनेते आकाश वाघमारे यांचे अनेक दिग्गज कलाकार तसेच हितचिंतकांकडून अभिनंदन होत असून त्यांना अभिनय क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. प्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांनीही आकाश वाघमारे यांना पुरस्कार प्रदान केल्यानंतर त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांच्या नाट्यरंग या नाटकासाठी व कला क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. साई प्रेरणा गौरव पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेते आकाश वाघमारे यांनी म्हटले आहे की, हा अभिनय क्षेत्रातील मानाचा व मोठा पुरस्कार मला व तेही ज्येष्ठ मराठी अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते मिळाल्यामुळे मोठा आनंद झाला आहे. या पुरस्कारामुळे माझ्या अभिनय क्षेत्रातील कार्यासाठी आणखी प्रेरणा त्यामुळे मिळत राहणार आहे. हा पुरस्कार माझ्या आई वडील मित्र नातेवाईक व आप्तेष्ट यांच्या सहकार्याने मिळाला आहे. या पुरस्कारामुळे माझा आत्मविश्वास आणखी वाढला असून मी यापुढे अभिनय क्षेत्रात आणखी चांगल्या जिद्दीने व चांगले काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. असे अभिनेते आकाश वाघमारे यांनी यावेळी म्हटले आहे. सावळीविहीर बुद्रुक या गावातूनही त्यांना प्रत्यक्ष भेटून, सोशल मीडियावर ,भ्रमणध्वनी द्वारे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
0 Comments