संदीप रामनाथ देशमुख हे कॉर्पस ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल व इंजिनिअर इंडियन आर्मी मधून तीस वर्ष देशाची सेवा पूर्ण करून 30 जून 2026 ला सुभेदार रँक वरून सेवानिवृत्त झाले आहेत. जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक या छोट्याशा गावातील संदीप देशमुख यांनी मोठ्या जिद्दीने इंडियन आर्मी मध्ये भरती होऊन सुरुवातीला बेसिक मिलिटरी ट्रेनिंग वन- सेंटर सिकंदराबाद तसेच नंतर रशियन टॅंक वरती टेक्निकल ट्रेनिंग व डिप्लोमा इंजिनिअर करून सेवापूर्ती केली आहे. त्यांनी ऑपरेशन कारगिल, ऑपरेशन पराक्रम मध्ये सहभाग घेतला होता. लेह,लडाख, सारख्या अति थंडगार क्षेत्रा मध्ये वर्कशॉप मधून आपली सेवा त्यांनी प्रधान केली होती. सन 2020 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी 15 जानेवारी 2022 रोजी आर्मी डे ला साऊथ वेस्टर्न कमांड जि ओ सी एन सी कमांडेशन कार्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तीस वर्षाची प्रदीर्घ देशसेवा करून संदीप रामनाथ देशमुख हे नुकतेच सेवानिवृत्त होत आहेत.
प्रदीर्घ देश सेवा केल्याबद्दल त्यांचा जिल्ह्याला मोठा अभिमान आहे. त्यांचा इंडियन आर्मी मधून सेवानिवृत्त झाल्याबद्दल भारतीय सेना दलाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच गावी आल्यानंतर त्यांचा येथेही सन्मानही होणार आहे. त्यांना सेवानिवृत्ती बद्दल शुभेच्छा देण्यात येत असून त्यांचे पुढील आयुष्य सर्व दृष्टीने यशस्वी व चांगले जावे, अशी त्यांच्या नातेवाईक, मित्र परिवार व हितचिंतकांकडून प्रार्थना करण्यात येत आहे. संदीप देशमुख यांना एक बंधू असून तेही आर्मीमध्ये आहेत. या कुटुंबाने देशसेवेला जणू वाहून घेतले आहे.
0 Comments