टाकळीभान सोसायटी विखे गटाच्या च्या ताब्यात



टाकळीभान(प्रतिनिधी)—श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील वि.वि. कार्य. सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी राहुल पटारे तर उपाध्यक्षपदी सुनंदाताई कोकणे यांची निवड करण्यात आली.
           शनिवार दि.४ जुलै रोजी सकाळी ११ वा. या निवडीबाबत संचालक मंडळाची बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी एकुण १३ संचालकापैकी ८ संचालक हजर तर ५ संचालक गैरहजर होते. अध्यक्ष मंजाबापू थोरात व उपाध्यक्ष अविनाश लोखंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सदर निवडी करण्यात आल्या.अध्यक्षपदासाठी राहुल पटारे यांच्या नावाची सुचना मंजाबापू थोरात यांनी मांडली तर त्यास अनूमोदन एकनाथ पटारे यांनी दिले. तर उपाध्यक्ष पदासाठी सौ.सुनंदाताई कोकणे यांच्या नावाची सुचना एकनाथ पटारे यांनी मांडली तर त्यास अनूमोदन अविनाश लोखंडे यांनी दिले.
या निवडीसाठी अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक रवि गडेकर, सहाय्यक अधिकारी रवि जाधव, सतिष कुदळे, कार्यकारी अधिकारी जगन्नाथ नरसाळे, कृष्णा शिंदे सचिव खोकर सोसा. प्रकाश मोरे कर्मचारी सहाय्यक निबंधक कार्यालय श्रीरामपूर यांनी काम पाहीले.
         यावेळी श्रीरामपूर तालुका मार्केट कमिटीचे माजी सभापती नानासाहेब पवार, म्हणाले, टाकळीभान विविध सेवा संस्था ही गेल्या आठ वर्षापासून कायद्याच्या चौकटीत राहून यावर प्रशासनाचा कारभार चालू होता परंतु सर्व सभासद व संचालक मंडळ यांनी सर्व मतभेद विसरून सभासदांच्या हितासाठी या संस्थेचा कारभार चालू असून या सेवा संस्थेसाठी अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून टाकळीभान सेवा संस्थेला सभासदांना कर्जमाफीचा कसा लाभ भेटेल यासाठी आमचा नेहमीच पाठिंबा राहील तरी या सर्व राजकीय नेत्यांनी संस्था टिकवण्यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून ही संस्था टिकवण्यासाठी स प्रयत्न करावा असे आव्हान पवार यांनी केली 
     
          यावेळी सोसायटीचे संचालक व उपसरपंच कान्हा खांडागळे म्हणाले की,गेल्या तीन चार दिवसापासून टाकळीभान सेवा संस्थेचा चेअरमन पदाचे व व्हा. चेअरमनचे खलबते चालू होते मात्र दोन कोकणे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून राहुल पटारे यांना चेअरमन पदाची तर व व्हा. चेअरमन पदी सौ. सुनंदा कोकणे यांना संधी प्राप्त झाली त्यामुळे त्यांची एक मतांनी निवड करण्यात आली येथून पुढे संस्थेचा कारभार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मार्केट कमिटीचे सभापती नानासाहेब पवार व मंजा बापू थोरात सोसायटीचा कारभार चालू राहील व सभासदांना योग्य न्याय दिला जाईल असेही खंडागळे यांनी आपले मत व्यक्त केले 
           यावेळी लक्ष्मण(भाऊ)थोरात, चित्रसेन रणनवरे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष मंजाबापू थोरात, उपसरपंच कान्हा खंडागळे, भाऊसाहेब पवार, माजी उपाध्य अविनाश लोखंडे, संचालक एकनाथ पटारे, विजय कोकणे, देवदान रणनवरे, संगीता गायकवाड, आप्पासाहेब रणनवरे, सुधिर मगर, पोपटराव पटारे, भाऊसाहेब पटारे, गोरक्षनाथ कोकणे, बाबासाहेब बोडखे, भाऊ कोकणे, गोरक्षनाथ खुरूद, अर्जून भालेराव, पप्पू रणनवरे, सचिव रामनाथ ब्राम्हणे, रघुनाथ शेळके, संजय ब्राम्हणे, छोटू बनकर, रवि शिरसाठ आदी उपस्थित होते.



 चेअरमन निवडीवर पाच संचालकांची हरकत.
------------------+---------------------------------------
नुकत्याच पार पडलेल्या पदाधिकारी निवडीसाठी संस्थेच्या पाच संचालकांनी राहुल पटारे यांच्या चेअरमन निवडीसाठी निवडणुक अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत घेतली होती. या हरकतीत म्हटले आहे कि, संचालक राहुल पटारे हे भूमीहीन आहे. त्यामुळे उपविधी ६ मधील १७ (उ ) नुसार त्यांचे सभासदत्व रद्द करुन त्यांना चेअरमन पदासाठी अपात्र करण्यात यावे. अशी हरकत निवडीपूर्वी घेण्यात आली होती. या हरकतीवर रोहीदास बोडखे, नितिन पटारे, पुष्पलता मगर, शिवाजी पवार, शांताबाई नाईक यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments