सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने घरातून बेपत्ता झालेली मनोरुग्ण तरूणी पालकाच्या स्वाधीन



टाकळीभान प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरात शनिवारी पहाटे घराच्या चाव्या घेऊन घराबाहेर पडलेली तरूणी बोरावके महाविद्यालयाच्या मागील भागातील इंदिरानगर कडे जाणा-या रस्त्यालगत रेल्वे रूळाजवळ ही तरूणी एकाच जागेवर दोन-तीन तास उभी होती ,हा प्रकार रस्त्याने ये-जा करणा-या नागरीकांनी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जपे यांना संपर्क करून सांगितला, त्यांनी जागेवर जाऊन खात्री केली व अपर पोलिस अधिक्षक कार्यालयातील दादासाहेब लोढे यांना पोलिस मदतीसाठी माहिती दिली, त्यांनी तात्काळ शहर पोलिस स्टेशनला कळवले दरम्यान जपे यांनी पोलिस मदतीसाठी क्रं ११२ वर संपर्क करून, घटनास्थळाची माहिती दिली.

 घटनास्थळावरून रितेश एडके,बाळासाहेब जपे यांनी पोलिस अधिकारी यांच्याबरोबर संपर्क केला, व सविस्तर माहिती दिली पोलिस हवालदार पोलीस कर्मचारी शेलार व खरात घटनास्थळी पोहचले काही वेळातच शहरातील काही भागातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा प्रकार तरूणीच्या पालका पर्यंत गेला, व पालकाचा संपर्क झाला, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जपे, रितेश एडके ,मनसेचे गणेश निमसे, सेनेचे प्रशांत मोरे, पोलिस हवालदार शेलार,खरात यांच्या उपस्थित तरुणीला पालकाच्या स्वाधीन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments