शनीदेव अपराध करणाऱ्यास सोडत नसुन, भक्ती पुण्य करणाऱ्यास पावतो - महंत रामगिरी महाराज



टाकळी भान प्रतिनिधी:- नऊ ग्रहापैकी शनि एक ग्रह असुन भक्ती करणाऱ्यांवर शनि महाराज कृपा करतात. मात्र अपराध करणाऱ्यावर अवकृपा करत सोडत नसल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी गोदाकाठावरील श्रीक्षेत्र शनि देवगांव येथील शनैश्र्वर देवस्थान येथे शनैश्र्वर जयंती व वैशाख शनिअमावास्या निमित्ताने संपन्न झालेल्या त्रिदीनी, सोहळ्याचे सांगता किर्तनातून भाविकांना उपदेश करताना केले.

           श्रीरामपूर - नेवासा गंगापुर-वैजापूर तालुका सीमेलगत गोदाकाठच्या शनिदेवगांव ( ता.वैजापूर) येथे शनिवार दि.१६ मे वैशाख शनि अमावास्या, व शनैश्र्वर जयंती निमित्ताने शनैश्र्वर देवस्थान पहाटे पासून तर सायंकाळपर्यत दर्शनासाठी भाविकांनी फुलून गेले होते सायंकाळी ६ नंतर भाविकांना लाईन लावून बारीमध्ये दर्शन घ्यावे लागले. गोदातीरावर शनैश्र्वर मंदिरांच्या दक्षिण बाजूस जायकवाडी बँकवॉटरचा थंड गारवा भाविक भक्तांना आकर्षित करत होता.अशा निसर्ग रमणीय वातावरणात सायंकाळी ७ वाजता हजारो महिला पुरुष भाविकांच्या उपस्थितीत महंत रामगिरी महाराज यांच्या किर्तनास प्रारंभ झाला. एवढा प्रभू भावे तेने संपूष्टी रहावे ।। या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण करताना महाराज पुढे म्हणाले की या अभंगवाणीतून संत तुकाराम महाराज परमात्म्याचे स्वरूपाचे वर्णन करतात. शनि देवगाव येथील हे गोदातीरावरील शनैश्वर देवस्थान पुरातन आहे. या पुरातन शनैश्वर देवस्थानामुळेच शनि देवगाव असे नामकरण झाले आहे. शनिदेव कुणालाच सोडत नाही अशी तमाम भक्त भाविक समाजात भावना आहे. परंतू तसे नसून शनिदेवता अपराध करणाऱ्या करिता कठोर असून त्यांच्यावर अवकृपा करत सोडत नाही. पुण्य करणाऱ्या भक्तांवर कृपा करत त्यास पावते, त्या पुण्यवान भक्तांचा उध्दार करते. सालाबादप्रमाणे यावर्षीही शनैश्र्वर जयंती निमित्ताने शनैश्र्वर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामस्थ , रामेश्वर भक्त मंडळ,गंगागिरी महाराज भकतमंडळ,जयबबा भक्त परिवार,आदी तरूण मंडळांनी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल महाराजांनी धन्यवाद दिले.

     
  या किर्तन सोहळा प्रसंगी संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे,वैजापूरचे नगराध्यक्ष दिनेश परदेशी, धनंजय धोर्डे, रामदरबार आश्रमाचे हरिशरण महाराज, शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज, दत्त आश्रमाचे योगेंद्रगिरी महाराज,गोदाधाम सराला बेट विश्वस्त मधु महाराज, रामभाऊ महाराज नादीकर, चंद्रकांत महाराज सावंत दत्तु खपके, विजय पवार,उदयसिंह पवार,सिताराम भराडे, मोहन गायकवाड ,शनि देवगाव सरपंच संजय मेघळे,चेंडुफळचे सरपंच प्रसाद पवार, राजेंद्र हुमे,भैरव कांगुणे, रामकिसन मेघळे,लखन मेघळे,रमेश मेघळे, प्रमोद मेघळे, विकास मेघळे,बाबासाहेब मेघळे, बाळासाहेब मेघळे, आशिष मेघळे, नानासाहेब मेघळे, रामनाथ मेघळे, राहुल पटरे, रविंद्र कनगरे,सुभाष भराडे, कचरु पडवळ, ज्ञानदेव काळे,(सर),पोलीस पाटील विजय भराडे,विलास पवार, डॉ संजय नेहे, डॉ गोकुळ चामे, संभाजी सवई,आदी उपस्थित होते.


चौकट.
      
शनिदेव येथील गंगागिरी सप्ताहाची ४२ लाख शिल्लक रक्कम आळंदी मठाचे बांदकामास - रामगिरी महाराज

   शनिदेव १७८ व्या सप्ताह करण्यात राजकीय नेते अथवा साखर कारखानदार नव्हते छोट्या छोट्या गावातील कष्टकरी शेतकरी यांनी हातभार उचलून उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल
       महाराजांनी पंचक्रोशीतील गावाचे कौतुक करताना.सप्ताहास भरघोस देणगी देऊन.सप्ताहात शिल्लक राहिलेली ४२ लक्ष रुपये रक्कम श्रीक्षेत्र आळंदी मठाचे बांदकामास वापरण्यात आल्याचे महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments