अर्ज देऊन महिना भराचा कालावधी लोटला, तहसिलदारांकडून चौकशीस टाळाटाळ, स्मरण पत्राद्वारे कारवाईची मागणी ---



दिलीप शिंदे
सोयगाव दि.१८-- सोयगाव तहसील कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या गौण खनिज माफिया ठेकेदारांकडून शासकीय नियमाप्रमाणे दंड वसूल करण्यात यावा अशी मागणी बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी दि.१६ एप्रिल रोजी तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.

मात्र महिन्याचा कालावधी लोटला असून तहसीलदार यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांना दि.१२ मे रोजी स्मरण पत्र दिल्याने तहसीलच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.दरम्यान दि.१६ एप्रिल रोजी दिलेल्या लेखी निवेदनात शासन हितार्थ तक्रारीची मुद्द्याची मुद्देसूद ठळक अक्षरात नमूद करण्यात आले आहे.नांदगाव तांडा ते पाचोरा या रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या गौण खनिजांची अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करून संबंधित ठेकेदाराने बेकायदेशीर रात्रंदिवस असंख्य वाहनातून भरमसाठ प्रमाणात वाहतूक केलेली आहे .या गंभीर प्रकरणाची तात्काळ सविस्तर तपासणी करावी व नांदगाव तांडा ते पाचोरा या रस्त्याचा संबंधित गौण खनिज माफिया ठेकेदारांकडून महाराष्ट्र राज्य शासनाने पारित केलेल्या अध्यादेशातील नियमानुसार प्रती ब्रास दंड वसूल करण्यात यावा. त्या करिता अवैध गौण बेकायदेशीर पद्धतीने चोरी केले आहे.त्यामुळे अवैध गौण खनिज चोरी केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून प्रती ब्रास दंडाची रक्कम वसूल कारवी.आपल्या स्थानिक मंडळ अधिकारी,तलाठी यांनी गौण खनिज माफिया ठेकेदाराशी आर्थिक हातमिळवणी करून आर्थिक देवाणघेवाण करून शासनाची फसवणूक करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून शासनाचा महसूल बुडविलेला आहे. संबंधित ठेकेदाराकडून गौण खनिज पोटी दंड वसूल करण्यात यावा व मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांना हरिभाऊ पाटील यांनी दिलेल्या स्मरण पत्रात म्हटले आहे. तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांच्याशी व्हॉट्सॲप द्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला तर मंडळ अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी देखील प्रतिसाद दिला नसल्याने गौण खनिज प्रकरणी दखल घेऊन बुडविलेला महसूल कोण वसूल करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सोयगाव तालुक्यात होत असलेल्या अवैधरित्या वाळू,मुरुम,माती यावर महसूल विभागाकडून कारवाई केली जात नसल्याने नुकताच जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारलेले जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. हे कारवाई संदर्भात काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अर्ज देऊन महिना भराचा कालावधी लोटला, तहसिलदारांकडून चौकशीस टाळाटाळ, स्मरण पत्राद्वारे कारवाईची मागणी --- 

Post a Comment

0 Comments