श्रीरामपूर हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंगजी बावरी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूर येथील नेवासा रोड माऊली वृद्ध आश्रममध्ये आंबे व केळी या फळांचे वाटप हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन आण्णा शितोळे व कार्यकर्त्यांच्या वतीने वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंगजी बावरी यांच्या वाढदिवसानिनित्त अहिल्यानगर, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव तसे सांगली, सातारा, कोल्हापूर मुंबई सोलापूर येथे प्रत्येक ठिकाणी अनाथ व वृद्धाआश्रम व गरजुंना हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने वाटप करण्यात येते. माऊली वृद्धआश्रम येथे लहान मुलांचे व वृद्धांचे पालन पोषण केले जाते. सरकारी अनुदान नसतांना सुद्धा अतिशय चांगले काम त्या ठिकाणी केले जाते. त्या मुलांना त्या माध्यमातून शाळेत पाठवून त्यांचे शिक्षण सुद्धा करण्यात येते. तेथील नुकतेच 7 ते 8 दिवसापूर्वी हरेगाव रोड येथील 2 लहान मुलांना त्यांच्या आई वडिलांनी सोडून गेले होते. तेथील गावकर्यांनी पोलिस स्टेशनला कळवून ते मुले पोलिसस्टेशन हजर केले. तेथील पी.आय देशमुख साहेबांनी त्या मुलांना माऊली वृद्धआश्रम येथे घेवूण गेले व तेथील व्यवस्थापक सुभाष वाघुंडे यांनी त्या मुलांना ठेवून घेतले व त्यांना शिरसगाव येथील शाळेत शिक्षण चालु केले. ज्यांचे वाढदिवस असतील त्यांनी सुद्धा श्रीरामपूर येथील माऊली वृद्धआश्रमला मदत करुण आपला वाढदिवस साजरा करावा. व काही दानशूर लोकांनी त्या आश्रमाच्या बांधकामासाठी भरीव मदत करावी. जेणे करुन तेथील वृद्धांना व लहान मुलांना राहण्याची व्यवस्था होईल. या कार्यक्रमासाठघी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे शहरप्रमुख मंगेश छतवाणी, जिल्हा उपप्रमुख बी.एम.पवार, प्रदेश संघटक मनोहर बागुल, पत्रकार बाळासाहेब भांड, कॉन्ट्रॅक्टर चंद्रकांत परदेशी, जिल्हा कार्याध्यक्ष चिलयिा तुवर, जिल्हा संघटक नंदकुमार बगाडे, डॉ.बाळासाहेब वाकडे, माजी कृषी अधिकारी प्रकाश ढोके, जिल्हासरचिटणीस सोपाण पागीरे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शिवाजी फोपसे आदि या काळक्रमास उपस्थित होते.
0 Comments