दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी- श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील गायकवाड निंबोणी मळा या ठिकाणी सायंकाळी साडेपाच दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉलीसह ट्रॅक्टर भरधाव व वेगात हरेगाव मार्गे नाऊर दिशेने जात असताना निमोणी मळा परिसरात ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीवर जोरात धडक देऊन खड्ड्यामध्ये पलटी झाले यामध्ये ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला सदरचा चालक नाऊर येथील असून रोहित अशोक आहिरे वय [ ३० ] वर्ष असुन दुचाकीचे मोठे नुकसान झाले
यामध्ये स्थानिक नागरिकांनी वडाळा महादेव येथील सरपंच तसेच ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी कळविले यावेळी सरपंच सचिन पवार यांनी स्थानिक नागरीकांच्या मदतीने दुसऱ्या ट्रॅक्टरच्या मदतीने ट्रॅक्टर खाली दबलेल्या व्यक्तींना बाहेर काढत रुग्णवाहिकेतून वैद्यकीय उपचारासाठी श्रीरामपूर साखर कामगार रुग्णालय या ठिकाणी हलविण्यात आले यावेळी नाऊर येथील ट्रॅक्टर चालक रोहित अशोक अहिरे मृत झाले असल्याची माहिती वैद्यकीय सुत्राकडून देण्यात आली - ट्रॅक्टरवर नंबर आढळून आला नाही तसेच दुचाकी स्टार सिटी एम एच १७ सी पी - ६७ ४७ असुन
तसेच अन्य व्यक्तींना वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांनी माहिती दिली पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.
0 Comments