नुकत्याच लागलेल्या HSC बोर्ड परीक्षेत शिक्षकांनी केलेले ज्ञानदान व त्यातूनच केलेले ज्ञानार्जन व त्यातूनच उल्लेखनीय कामगिरी केलेले गुणवंत विद्यार्थ्यी व त्यांच्यातच स्वप्न बघणाऱ्या त्यांच्या पालकांचा गुणगौरव असा सोहळा संजीवनी रूरल एज्युकेशनचे विश्वस्त मा श्री सुमित दादा कोल्हे व संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ निकीताताई कोल्हे यांच्या उपस्थित उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमासाठी HSC बोर्ड परिक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यां बरोबरच त्यांच्या आईवडिलांना कॉलेजने आमंत्रित केलेले होते. कारण ज्या विश्वासाने पालक हे विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतात आणि त्या पालकांना तुमचं मुल हे आमचंच मुल याप्रमाणे एक गुणवत्तापुर्ण व दर्जेदार असे विद्यार्थी घडवायाचे काम संजीवनी कॉलेज करते व त्यातूनच पालक वर्गाच्या मनात संजीवनी बद्दल एक दृढ विश्वास हा वैजापूर शहर व ग्रामीण भागातील पालकांच्या मनात तयार झाल्याचे दिसत आहे
याप्रसंगी आपल्या भाषणात मा सुमित दादा कोल्हे म्हणाले की, वैजापूर शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कोपरगावला येण्याचा प्रवाह बघून त्यांचा येण्याजाण्याची दगदग व त्यासाठी लागणारी आर्थिक झळ वाचवण्यासाठी आम्ही भाजीमंडी मध्ये या कॉलेजचा श्रीगणेशा केला आणि तेव्हापासूनचच गुणवत्तापूर्ण अशा मिळालेल्या शिक्षणामूळे आम्हाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे हे कॉलेज अशाप्रकारे गरुडझेप घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
गुण गौरव केलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले आम्ही तुम्हाला केवळ बुके व शॉल देवून स्वागत करणे एवढाच नाही तर तुम्ही तुमच्या पुढची शैक्षणिक पायरी अजूनही जोमाने पार करावी हेच आमचे व तुमच्या आईवडिलांचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले.
वैजापूर भाग म्हणजे ग्रामीण व शेतकऱ्यांचा परिसर आहे आणि या गोष्टीचा मुद्दा साधत त्यांनी सांगितले की तसं बघितलं तर हा गरीब व सर्व सामान्य असा विद्यार्थीच शक्यतो खऱ्या अर्थाने हा पुढे असतो असेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी आपल्या भाषणात शिक्षकेतर वर्गात कार्यरत असलेल्या श्री अविनाश गोपीनाथ जगताप यांच्या लेखनाच्या आवडीबद्दल गौरद्गगार करून त्यातून त्यांची संस्थेच्या कामकाजात बारीक अचूक नजर असते असे सिद्ध होते
या कार्यक्रमाचे प्राचार्य श्री विनोद शेटे सर यांनी प्रास्ताविक तर सुत्र संचालन श्री विशाल देवकर सर यांनी केले.
पालक वर्गातून देखील अनेकांनीविद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीबद्ल समाधान व्यक्त करत सौ.यशोदा अविनाश जगताप यांनी सांगितले की मला खूपच दिवसापासून संजीवनी मध्ये येण्याची तर इच्छा होती मात्र माझे पती येथे जॉबला असलेल्याने मी कधी येथे आलेच नाही मात्र माझे ते स्वप्न माझ्या मुलाने अशाप्रकारे उत्कृष्टपणे मिळवलेल्या गूणातून पुर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.तसेच गुणवत्ता पूर्ण व एक दर्जेदार शिक्षण देणारी व मुलींची सर्वांगीण काळजी घेणारे कॉलेज म्हणजे एकमेव संजीवनी कॉलेज असल्याचे सौ. कुंभकर्ण व श्री अविनाश गोपीनाथ जगताप या पालकांनी आपल्या मनोगतातून सांगितले
या कार्यक्रमासाठी ॲडमीन श्री कार्तिक जगताप सर व कॉलेजचे सर्व शिक्षक व अकॅडमी व कॉलेजचे शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.
0 Comments