टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथील माजी सभापती नानासाहेब पवार यांना नुकतेच आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आदर्श समाजसेवक पुरस्काराने पवार सन्मानित
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी जि. प. प्राथमिक शाळेच्या शताब्दी महोत्सव सोहळ्यानिमित्त माजी सभापती नानासाहेब पवार यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते पवार यांना
पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. पवार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे नितीन औताडे, राघवेश्वर महाराज, राजेश परजणे, नानासाहेब तुवर, रमेश धुमाळ, माजी सरपंच चित्रसेन रणनवरे, माजी चेअरमन राहुल पटारे, सुधीर मगर, विकास मगर शिवाजीराव धुमाळ, बाळासाहेब शेळके, अशोक धोत्रे आदींनी कौतुक केले.
0 Comments