सोयगाव पंचायत समितीचे नवनियुक्त सहाय्यक गटविकास अधिकारी यांचे पदाधिकारी यांच्याकडून स्वागत ---



दिलीप शिंदे 
सायगाव दि.१९-- सोयगाव पंचायत समिती येथे नवनियुक्त सहायक गटविकास अधिकारी अमोल जगताप यांचे पंचायत समितीचे सभापती उत्तम चव्हाण शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख (उबाठा) दिलीप मचे व सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी काळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.


 यावेळी उपस्थित मान्यवरांनी अमोल जगताप यांना पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा देत, सोयगाव तालुक्याच्या विकासकामांना अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस सुनील गावंडे, राठोड, रवींद्र पाटील, खरेदी-विक्री संघाचे संचालक मयूर मनगटे, गजानन शिंदे, सीताराम जाधव, संभाजी पवार, नाना शिंदे, विजय गव्हाड तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments