दिलीप शिंदे
सोयगाव दि.१९-- सोयगाव शहरालगत असलेल्या साई पेट्रोल पंपावर इंधनासाठी दि.१९ मंगळवारी रात्री साडे आठ वाजेपासून दुचाकी ,चारचाकी व ट्रॅक्टर च्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनधारक व शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.
तर पेट्रोल पंपावर झालेल्या गर्दीमुळे पेट्रोल पंप चालकाची तारांबळ उडाली होती.दरम्यान सोयगावात इंधनाचा तुटवडा भासु लागल्याने वाहनधारक व शेतकऱ्यांनी पेट्रोल डिझेलसाठी पेट्रोल पंपावर गर्दी केली होती. संत गाडगे बाबा चौकापासून पेट्रोल पंप पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पूर्वी शेतकरी शेतीची मशागत बैलजोडीने करीत असत,शेतीसाठी लागणारी लोखंडी नांगर,लाकडी औजारे यांचा वापर करीत असे.ही व्यवस्था लोप पावली आहे. आता शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीची मशागत करण्यासाठी करीत आहे. यात प्रामुख्याने ट्रॅक्टर चा वापर करीत आहे.डिझेल व पेट्रोलचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी मोठा आर्थिक भूडंड दिसावा लागत असल्याने शेतकऱ्यांकडून सरकार विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पेरणीची दिवस जवळ आल्याने शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.
ट्रॅक्टर धारकांकडून शेतकऱ्यांना डिझेलची व्यवस्था करून ठेवा असे सांगितले जात असल्याने शेतकऱ्यांना डिझेल मिळावे यासाठी डिझेल कॅन घेऊन पेट्रोल पंपावर रांगेत उभे राहावे लागत आहे. सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांना रांगेत उभे राहण्याचा लागलेला श्राप मिटत नसल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीचा दिलेला सल्ला शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या गळ्यात काटा रुतल्या सारखा आहे.गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत भाजपाची सत्ता आहे.सोयगाव तालुक्यात असलेल्या सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी,अधिकारी स्थानिक ठिकाणी न राहता दुचाकी व चारचाकी वाहनाने ये -जा करीत आहे. कर्मचारी,अधिकारी हे शासकीय लाभ घेऊन शासनाला आर्थिक चुना लावीत आहे. प्रधानमंत्रांनी दिलेल्या काटकसरीच्या सल्ल्याला शासकीय कर्मचारी,अधिकारी यांनी केराची टोपली दाखवली आहे. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोण कार्यवाही करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काटकसर कुणी करावी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
0 Comments