दिलीप शिंदे
सोयगाव दि.२०-- ऑनलाइन औषधी विक्री बंद करावी व अन्य मागण्यासाठी दि.२० बुधवारी, एक दिवसीय औषधी दुकाने बंद ला सोयगाव तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून सर्व औषधी दुकाने बंद होती .
दरम्यान ऑनलाइन औषधी विक्री बंद करावी तसेच अन्य मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार पत्रिके यांना देण्यास आले या वेळी सोयगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष संजय शहापूरकर, दिनेश पंडित, नितीन चव्हाण, अनिकेत सोनवणे, मयुर राऊत, रवींद्र जाधव, परवेझ देशमुख, मंजूर पटेल,साद देशमुख, नावेद देशमुख,विकास मंडवे, गणेश पाटील, अमोल पाखरे, विनोद सोहनी यांच्यासह अनेक औषधी विक्रेते उपस्थित होते.
0 Comments