अहिल्या नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील सुरभी मंगल कार्यालयात रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटी मुंबई यांच्या वतीने करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आर टी चे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री सुनीलजी वारे साहेब आय आर ए एस हे उपस्थित होते तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून आर टी च्या निबंधक माननीय श्रीमती इंदिरा अस्वार मॅडम या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रास्ताविकेमध्ये प्राध्यापक डॉक्टर भाऊसाहेब पवार यांनी कार्यशाळा घेण्यामागील प्रेरणा सांगून महाराष्ट्रात मातंग समाजाच्या विकासासाठी नव्याने निर्माण झालेली आर टी ची माहिती तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची भूमिका मांडली .कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुनील जी वारे साहेब यांच्या हस्ते मातंग समाजातील गुणवंतव यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष भाषणात त्यांनी मातंग समाजातील विद्यार्थ्यांना आयएएस, आयपीएस डॉक्टर, इंजिनीयर ,अशी मोठी ध्येय बाळगण्याचे आव्हान करून ते साध्य करण्यासाठी आर टी च्या वतीने सर्वोत्परी मदत करण्याची आश्वासन दिले प्रमुख मार्गदर्शिका श्रीमती इंदिराआस्वार मॅडम यांनी मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी आरटी च्या वतीने दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या सर्व योजनांची माहिती दिली त्यात सर्व क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण व इतर व्यावसायिक प्रशिक्षणासाठी केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीची माहिती देऊन उपस्थितांच्या सर्व शंकांचे निरसन केले. यावेळी दुसऱ्या सत्रात देअसरा या संस्थेच्या वतीने श्रीमती मनस्वी तपासे यांनी नोकरी घेणारे न बनता नोकरी देणारे उद्योजक बना याविषयी समाजातील विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच संतोष वायदंडे, आणि हरिदास मानते यांच्या संस्थेच्या वतीने देखील समाजातील विद्यार्थ्यांना विविध कौशल्य विकास योजनांची माहिती देऊन विद्यार्थ्यांची नोंदणी मोहीम राबविली .हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी ॲड .विक्रम गायकवाड साहेब अध्यक्ष मातंग समाज महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी आर टी व अहिल्यानगर जिल्हा उत्तर विभाग यांच्यातील दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली सदर कार्यशाळा यशस्वी व्हावी म्हणून या भागातील विशेषतः सेवानिवृत्तांनी पुढाकार घेतला होता त्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर भाऊसाहेब पवार ,श्री संजय भोंडवे, श्री संजय कुमार शिंदे, श्री दीपक जाधव साहेब ,श्री विश्वनाथ आल्हाट सर ,श्री गुलाबराव भडकवाड सर ,श्री बालाजी जाधव साहेब ,श्री प्रकाश जगधने ,श्री लहानु खरात ,श्री शिवाजी वायदंडे ,श्री शशिकांत शेलार ,मेजर यशवंत पवार ,प्रा.रघुनाथ खरात, बाळासाहेब बोरुडे ,आणि प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब रणपिसे ,प्राध्यापक डॉक्टर साहेबराव गायकवाड, प्राध्यापक डॉक्टर रोहित भडकवाड ,प्राध्यापक डॉक्टर सुदाम शिंदे ,प्राध्यापक डॉक्टर अंकुश सूर्यवंशी ,रवींद्र कांबळे
प्रा.रघुनाथ खरात व मेजर यशवंत पवार.
यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले .तसेच सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन राहता, कोपरगाव, संगमनेर ,अकोले, श्रीरामपूर, नेवासा, व राहुरी येथील प्राध्यापक ,अधिकारी, शिक्षक वर्ग ,व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले .या कार्यक्रमाला मातंग समाजातील प्रतिष्ठित मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मातंग समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनीसह मोठ्या प्रमाणात पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांना आवश्यक ती मदत करण्यासाठी आर टी चे श्री अनिल वारे साहेब श्री नामवाड साहेब आणि श्री भालेराव स्वप्निल साहेब यांच्यासह आर टी चेसर्व अधिकारी वर्ग कार्यरत होते. सदर कार्यक्रम हा लोणी बुद्रुक येथील सुरभी मंगल कार्यालयात पार पडला .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय कुमार शिंदे यांनी प्रभावीपणे केले तर प्राध्यापक डॉक्टर साहेबराव गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.
0 Comments