टाकळीभान प्रतिनिधी- येथील बसस्थानक परीसरात शिवजयंतीच्या मुहुर्तावर छञपती शिवाजी महाराज यांचा भव्य आश्वारुढ पुतळा बसवल्याने प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात धुसफुस सुरु आसल्याने काल झालेल्या ग्रामसभेत पुतळ्याच्या परवानगीसाठी कागदपञाची जुळवाजुळव सुरु आसल्याने कायदेशिर पुर्तता होईपर्यंत पुतळा हटवु नये असा एकमुखी ठराव करण्यात आला.
प्रसंगी जेलमध्ये जाण्याचाही आक्रमक पविञा अनेकांनी बोलताना केल्याने झालेली ग्रामसभा पुतळ्याभोवतीच गुरफटली गेल्याचे चिञ पहावयास मिळाले. ग्रामसभेच्या आध्यक्षस्थानी सरपंच अर्चना रणनवरे होत्या.
शासकीय परीपञकानुसार महाराष्ट्र दिनी १ मे रोजी घेण्यात येणारी ग्रामसभा काल २० मे रोजी ग्रामसचिवालयाच्या सभागृहात पार पडली. उपसरपंच कान्हा खंडागळे, तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. डौले, कृषी सहाय्यक धुमाळ, तलाठी रुपाली रामटेके, पशु वैद्यकिय आधिकारी उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी भिंगारदे यांनी घरकुल योजना, शासकिय जागेवरील २०११ पुर्वीची निवासी अतिक्रमण नियमानुकुल करणे, मुख्यमंत्री ग्रामसमृध्दी योजना व ईतर योजनांची ग्रामसभेला माहीती दिली.
यावेळी छञपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याबाबत ग्रामसभेत महत्वपुर्ण चर्चा झाली. यावेळी शिवाजी शिंदे म्हणाले पुतळा हटवण्यासाठी प्रशासनाने ग्रामस्थांवर दबाव आणु नये. प्रशासनाने जबरदस्तीने पुतळा हटवण्याचा प्रयत्न केल्यास ग्रामस्थ विरोध करतील. वेळप्रसंगी तुरुंगात जाण्याची वेळ आली तरी चालेल माञ पुतळा हटवु दिला जाणार नाही. परवानगीसाठी कागदपञाची पुर्तता केली जात आहे. यावेळी माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे म्हणाले कि, केंद्रात व राज्यात छञपतींच्या विचाराचे सरकार आहे. छञपती ही महाराष्ट्राची अस्मीता आहे. छञपतींचे विचार नव्या पिढीत रुजवणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने पुतळा हटवण्याचा प्रयत्न करु नये. भाजपाचे नारायण काळे म्हणाले कि, अनेक ठिकाणी छञपतींचे पुतळे बसवले गेले आहेत. मग येथील पुतळ्याबाबतच प्रशासन टोकाची भुमिका का घेत आहे ? मोठ्या लोकसंख्येच्या गावात प्रशासन तेढ निर्माण करीत आहे कि काय ? याबाबत शिवप्रेमींमध्ये शंका उपस्थित होत आहे. पुतळ्याच्या परवानगीची कायदेशीर पुर्तता सुरु आसल्याने पुतळा हटवण्याचा प्रशासनाने प्रयत्न करु नये. माजी उपसरपंच भारत भवार यावेळी म्हणाले कि, छञपतींच्या पुतळा जागेवरच असावा. प्रशासनाने छेडछाड करु नये. अनिल बोडखे म्हणाले कि, पुतळ्यासाठी गट नं. २४५,२४६,२४७ मध्ये एक गुंठा जागा मिळावी. राहुल पटारे म्हणाले कि, छञपतीच्या पुतळ्यासाठी कोणाचाही विरोध नाही. याबाबत पालकमंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेवुन तोडगा काढण्यात येईल. सर्व ग्रामस्थ त्यासाठी पाठपुरावा करु. बापुसाहेब शिंदे म्हणाले कि, अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी निवासी जागेवरच करावे तसेच छञपतींचा पुतळा हलवु नये.
यावेळी छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळा हटवला जावु नये याबाबत सर्व उपस्थित ग्रामस्थांनी जोरजोरात घोषणा देत पुतळ्याच्या बाजुने एकमुखी समर्थन दिले. एकुणच ग्रामसभा छञपतींच्या पुतळ्यानेच गाजली. याबाबत ग्रामसभेचा ठराव प्रशासनाला देण्यात येणार आसल्याची माहीती पुतळा स्मारक समितीच्या वतीने देण्यात आली. या प्रसंगी बंडु बोडखे, यशवंत रणनवरे, सुनिल बोडखे, अनिल पटारे, रंजित मगर, बब्लु वाघुले, अक्षय कोकणे, पवन मगर, संभाजी पटारे, पांडु मगर,ज्ञानेश्वर कोकणे, दत्ताञय नाईक, भाऊसाहेब पटारे, एकनाथ पटारे, जयकर मगर, प्रशांत कोकणे, सुरज कोकणे, बंटी गलांडे, विलास बोडखे, सुरेश पटारे, भाऊसाहेब पवार, सुजित गोंडे, गौरव चितळे, काका कोकणे आदींसह तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सरपंच अर्चना रणनवरे यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.
चौकट ---
----------------
ग्रामसभेसाठी तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. डौले उपस्थित होते. ते म्हणाले कि, कायदा व सुव्यवस्था राखने पोलिसांचे कर्तव्य आहे. त्यामुळे आडमुठी भुमिका कोणीही घेवु नये. ग्रामसभेत छञपतींच्या पुतळ्याबाबत जो काही ठाराव केला जाईल त्या ठरावाची नक्कल प्रशासनाला द्या. ती वरीष्ठांपर्यंत पोहच केली जाईल. त्यावर वरीष्ठ पातळीवर निर्णय होईल.
0 Comments