सहकाराची जननी म्हणून देशात फक्त लोणी प्रवरा नाव काय आहे हे सांगताना अभिमान वाटतो - सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे

विजय बोडखे                    

सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया )

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील,पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील,यांच्या नावामुळे सहकाराची जननी म्हणून देशात फक्त लोणी प्रवरा नाव काय आहे हे सांगताना आपल्याला फार अभिमान वाटतो आपण या परिसरातले माणसं आहोत हे सांगताना आम्ही या मातीतील जन्म घेतलेले नागरिक आहोत हे सांगताना आम्हाला फार अभिमान वाटतो असे प्रतिपादन पुणेमहानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुरेखा भनगे यांनी केले.

                             राहाता तालुक्यातील राजुरी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय व माध्यमिकविद्यालयातील माजी विद्यार्थी मेळावा राजुरी येथील पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील माजी विद्यार्थी भवन येथे नुकताच संपन्न झाला. 
यावेळी सहाय्यक आयुक्त सुरेखा भनगे यांनी आपले विचार व्यक्त केले.त्या पुढे म्हणाल्या की आपण ग्रामीण भागात जन्म घेतलेले साधी माणसं आहोत.या भागातून आपण शिकून मोठ्या पदापर्यंत गेलो आहोत.बाहेर सांगतानाआपल्या प्रवरा परिसराचे आहे हे सांगताना मोठा अभिमान वाटत असून बाहेर मोठ्या पदावर गेल्यानंतर ज्या गावातून आपण शिकून गेलो त्या गावाला न विसरता त्या गावाचे आपण काहीतरी देणे लागतो हे लक्षात ठेवून जर माजी विद्यार्थ्यांनी काम केले तर आपल्या गावाचा विकास होण्यास वेळ लागणार नसून राळेगण सिद्धी व हिवरे बाजार या गावाप्रमाणे आपले ही गाव नकाशावर येऊ शकते या साठीबाहेरगावी गेलेल्या व मोठ्या पदावर असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी हे जर मनावर घेतले तर हे शक्य होऊ शकते असे ही त्या म्हणाल्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सुंदरदास गोरे नेत्रतज्ञ अहिल्यानगर,उद्योजक बाळासाहेब गोरे,नायब तहसीलदार सुभाष कदम,डॉ सोपान गोरे ,उद्योजक पोपटराव थोरात,विखे कारखान्याचे संचालक,उपसरपंच डॉ सोमनाथ गोरे,शास्त्रज्ञ मच्छिंद्र भालेराव,उद्योजक सतीश कबाडे,माजी सैनिक रमेश रोकडे,प्रवरा बँकेचे तज्ञ संचालक सोपानकाका गोरे,विद्यालयाच्या प्राचार्य डॉ सौ माधुरी सातपुते,पोलीस पाटील ज्ञानदेव कळमकर,एडवोकेट दिगंबर धनवटे ,तंटामुक्तीचे उपाध्यक्ष जालिंदर पठारे,इंजिनीयर अजित बेंद्रे,सामाजिक कार्यकर्ते नारायण बेंद्रे,राजेंद्र बोडखे सर,माजी चेअरमन अशोकराव गोरे,चंद्रशेखर जगताप,युनूस इनामदार,सौ नेहे मॅडम,बाबासाहेब गोरे सर,चांगदेव भालेराव सर,माजी प्राचार्य भाऊसाहेब बेंद्रे,सामाजिक कार्यकर्ते गजानन गोरे पत्रकार विजय बोडखे,
यांच्यासह माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी या मेळाव्यास उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट दिगंबर धनवटे यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ माधुरी सातपुते यांनी मानले.या माजी विद्यार्थी मेळाव्याचे नियोजनासाठी माजी विद्यार्थी प्रवरा सहकारी बँकेचे तज्ञ संचालक एडवोकेट सोपानराव गोरे,शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ सातपुते मॅडम,व सर्व शाळेच्या शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.    
                                       (छायाचित्र विजय बोडखे)

Post a Comment

0 Comments